शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक बलात्काराच्या आरोपीच्या रिलेशनशिपमध्ये होती 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री 

By पूनम अपराज | Updated: December 23, 2020 21:39 IST

1 / 5
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील खासदार नुसरत जहाँ हे चर्चेतील व्यक्तिमत्व आहे. बंगाली चित्रपटांमधील सुपरहिट अभिनेत्री नुसरत जहाँ २०१९ मध्ये पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून लोकसभा खासदार म्हणून निवडून आल्या.
2 / 5
मात्र, आता नुसरत जहाँ यांचं नाव एका सामूहिक बलात्कारातील आरोपीशी देखील जोडलं गेलं असल्याने खळबळ माजली आहे.
3 / 5
५ फेब्रुवारी २०१२ ला कोलकाताच्या पार्क स्ट्रिट परिसरात एका विवाहित महिलेवर पाच तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आणि चालत्या गाडीतून फेकून भामटे फरार झाले होते. ही घटना उघडकीस येताच मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त केला गेला होता.
4 / 5
पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर तीन आरोपींना तात्काळ अटक केली. मात्र, दोन दोन आरोपी अजूनही फरार आहेत. फरार आरोपींमध्ये कादर खान आणि मोहम्मद अली यांचा समावेश होता. नुसरत जहाँ तेव्हा कादर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. 
5 / 5
सामूहिक बलात्कारात आरोपी काही महिने आधीच दोघांच्या प्रेमसंबंधांना सुरुवात झाली होती. त्याच वर्षी दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय़ घेतला होता. मात्र, हे सर्व होत असताना बाकीच्या त्यांना अडचणी आणणाऱ्या गोष्टी ही सोबत घडत होत्या. सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतरही फरार आरोपी कादर खान नुसरत जहाँ यांच्या संपर्कात असल्याचा आणि त्यांनी ही गोष्ट लपवल्याचा आरोप करण्यात आला होता. 
टॅग्स :Rapeबलात्कारnusrat jahanनुसरत जहाँtmcठाणे महापालिकाbollywoodबॉलिवूड