शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 14:26 IST

1 / 10
३ जुलै २०२५ रोजी धर्मस्थळ मंदिरात १९ वर्षे सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला. त्याने स्वतःच्या हातांनी शेकडो मृतदेह पुरले आहेत. यातील बहुतेक मृतदेह महिला आणि मुलींचे होते, ज्यांच्यावर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली असा सफाई कामगाराने दावा केला
2 / 10
मात्र हा माजी सफाई कामगार कोण आहे हा प्रश्न अजूनही कायम आहे. तक्रारीत माजी सफाई कामगाराने म्हटले आहे की, तो १९९५ ते २०१४ पर्यंत धर्मस्थळ मंदिर प्रशासनासाठी काम करत होता. १९९८ ते २०१४ दरम्यान त्याला शेकडो मृतदेह पुरण्यास किंवा जाळण्यास भाग पाडण्यात आले. आता या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे.
3 / 10
माजी सफाई कामगाराच्या तक्रारीवरून ज्या ठिकाणी त्याने मृतदेह पुरल्याचा दावा केला होता त्या ठिकाणांची झडती घेण्यात आली. या ठिकाणांमधून असे काही निष्पन्न झाले ज्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला. पहिल्या दिवशी मंगळवार २९ जुलै २०२५ ला नेत्रावती नदीच्या काठावरील साइट क्रमांक १ वर उत्खननाचे काम सुरू झाले. त्या मास्क घातलेल्या सफाई कर्मचाऱ्याची आतापर्यंत ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे ज्याने एसआयटीला अशा १३ ठिकाणांची माहिती दिली.
4 / 10
कर्मचाऱ्याने त्याच्या जबाबात या ठिकाणी मृतदेह पुरल्याचा दावा केला. पहिल्या दिवशी, साइट क्रमांक १ वर सुमारे ६ तास खोदकाम चालू राहिले. कामगारांनी १५ फूट खोल खड्डा खोदला पण त्यांना मृतदेह, सांगाडा किंवा मानवी हाडे सापडली नाहीत. पहिल्या दिवसाच्या अपयशानंतर दुसऱ्या दिवशी ३० जुलै २०२५ रोजी एसआयटीने साइट क्रमांक २, ३, ४ आणि ५ या चार नवीन ठिकाणी खोदकाम सुरू केले.
5 / 10
सकाळपासून संध्याकाळपर्यंत १२ ते १५ फूट खोल खड्डे खोदण्यात आले. साइट क्रमांक ३, ४ आणि ५ वरही सांगाडा किंवा मृतदेह सापडला नाही. परंतु साइट क्रमांक २ वर असे काहीतरी सापडले, ज्यामुळे तपासाला एक नवीन वळण मिळाले. अडीच फूट खोलीवर मातीतून एक लाल फाटलेला ब्लाउज, पॅन कार्ड आणि एटीएम कार्ड सापडले.
6 / 10
एक कार्ड एका पुरूषाच्या नावावर होते तर दुसरे लक्ष्मी नावाच्या महिलेच्या नावावर होते. धर्मस्थळाजवळ राहणाऱ्या लक्ष्मी नावाच्या महिलेचा २००९ मध्ये मृत्यू झाला होता, परंतु पोलिसांच्या नोंदींमध्ये तिचा उल्लेख नव्हता हे तपासात असे दिसून आले. दोन दिवसांच्या या कामानंतर संशयाची सुई आता सफाई कर्मचाऱ्याच्या दाव्याकडे वळत होती.
7 / 10
अनेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर एसआयटीने साइट क्रमांक ६ वर खोदकाम सुरू केले. ही तीच जागा होती जिथे कर्मचाऱ्याने अनेक मृतदेह पुरल्याचा दावा केला होता. अचानक मातीमध्ये काही हाडे दिसली. कामगारांना अवजारे सोडून हाताने माती काढण्यास सांगण्यात आले. सर्व हाडे जप्त करण्यात आली. हाडे सापडल्यानंतर, एसआयटीने साइट क्रमांक ६ च्या आसपास अधिक खोदकाम करण्याचा निर्णय घेतला. मातीचे नमुने घेण्यात आले आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
8 / 10
साइट क्रमांक १ ते १३ या ठिकाणी वेगवेगळ्या संख्येने मृतदेह पुरण्यात आले होते. ६ आणि ७ या ठिकाणी ८ मृतदेह पुरण्यात आले, ११ या ठिकाणी ९ मृतदेह पुरण्यात आले आणि १३ या ठिकाणी सर्वाधिक मृतदेह पुरण्यात आल्याचा दावा कर्मचाऱ्याकडून करण्यात आला होता. त्याने अशा ५० हून अधिक ठिकाणांची ओळख पटवली होती, त्यापैकी काही ठिकाणी मोठ्या संख्येने मृतदेह पुरण्यात आले होते.
9 / 10
साइट नंबर १३ ही अशी जागा होती जिथे सामूहिक दफन करण्यात आले. त्या ठिकाणी उत्खनन अद्याप सुरू झालेले नाही. साइट नंबर १३ ही पहिली सामूहिक दफन जागा आहे. जिथे पुढील २४ ते ४८ तासांत या ठिकाणी खोदकाम सुरू होण्याची शक्यता आहे. साइट २ वर ब्लाउज आणि एक कार्ड सापडल्यानंतर एसआयटीने लोकांना त्यांच्या तक्रारी घेऊन पुढे येण्याचे आवाहन केले.
10 / 10
या प्रकरणाबाबत मंगळुरूच्या मल्लिकट्टे येथील सरकारी अतिथीगृहात एसआयटीचे तात्पुरते कार्यालय सुरू करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. यासाठी व्हॉट्सअॅप नंबर, टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडी देखील जारी करण्यात आले होते.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी