1 / 5तेथे रस्त्याच्या कडेला कुत्रा दिसला ज्याच्या तोंडावर मानवी मुंडके होते. हे घाबरून टाकणारे दृश्य सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. कुत्राने हे मुंडकं रस्त्याच्या कडेला सोडले, जे लोक येताना- जाताने पाहतच राहिले.(All Photo - Aaj Tak)2 / 5खरं तर, गुरुवारी खम्मम जिल्ह्यात चर्च कंपाऊंडवरील एका पार्कजवळ मानवी मुंडकं दिसलं. तेथून येताना हे भयानक दृश्य जेव्हा लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली.3 / 5प्रथमदर्शनी पोलिसांना वाटले की, ही निर्घृण हत्या आहे, परंतु तेथील सीसीटीव्ही तपासणी करण्यात आले तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली.4 / 5हे मुंडकं एका कुत्र्याच्या तोंडात असल्याचे पोलिसांनी सीसीटीव्हीमध्ये पाहिले आणि त्याने हे मुंडकं कोठून आणले असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ते मुंडकं रस्त्याच्या कडेला कुत्र्याने सोडले.5 / 5नंतर, रेल्वे ट्रॅकच्या कडेला एक धड सापडले, जे २८ वर्षीय गुगुलोथु राजू अशी त्याची ओळख पडली गेली. कुत्र्याच्या तोंडातील मुंडके त्याच्याच होते.याबाबत पोलिसांचा असा संशय आहे की, बुधवारी रात्री राजूने चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर सकाळी कुत्रा त्याच्या तोंडात रेल्वे रुळाच्या कडेला पडलेले मुंडके घेऊन रस्त्याच्या कडेला निघून गेला.