By पूनम अपराज | Updated: November 6, 2020 19:05 IST
1 / 6मुंबई बॉंम्बस्फोटातील आरोपीच्या वादग्रस्त मृत्यूमुळे त्यांचं निलंबन झालं होत, नुकतेच ते पुन्हा पोलीस दलात पुन्हा रुजू झाले आहेत2 / 6त्यानंतर रिपब्लिकचे पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या वाहिनीवर आरोप होत असलेल्या टीआरपी स्कॅमपासून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडेच आहे. 3 / 6सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता. 4 / 6वाझेही या आरोपींपैकी एक होते. या प्रकरणात आरोपीला चौकशीला नेत असताना गाडीचा अपघात होऊन तो पळून गेल्याचे सांगण्यात आले, मात्र कुटुंबियांचे आरोप वेगळे होते, याच प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले.5 / 6सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. टेक्नो सॅव्ही असलेल्या वाझेंनी लईभारीडॉटकॉम नावाचे एक अॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे.6 / 6सचिन वाझे यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचे पुस्तक मराठीत लिहिले होते. शीना बोरा हत्या प्रकरण आणि डेविड हेडली यांच्यावरही त्यांनी पुस्तकं लिहिली.