शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! १३ वर्षाच्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा 

By पूनम अपराज | Updated: January 26, 2021 20:51 IST

1 / 5
सरकारी शाळेतील शिक्षकावर बलात्काराचा आरोप आहे. असं सांगितलं जात आहे की, ही मुलगी गरीब कुटुंबातील आहे. तिच्या घरात वीज नाही.
2 / 5
पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात अजयगड येथे तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
3 / 5
पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, तिच्या 13 वर्षाच्या मुलीला तिच्या सरकारी शाळेतील 50 वर्षाच्याशिक्षकाने तिच्या वासनेचा बळी दिला. मुलगी आपल्या लहान भावाला बोलवण्यासाठी शिक्षकाच्या घरी गेली, जिथे भाऊ टीव्ही पहात होता. शिक्षकाने तिच्या धाकट्या भावाला पाठवले. पण मुलीला बहाणा करून थांबवले आणि तिच्याबरोबर बलात्काराची घटना घडवून आणली.
4 / 5
घरी परत आल्यानंतर पीडित मुलीने तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. यानंतर मुलीच्या वडिलांनी आपल्या सोसायटीतील लोकांना पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि आरोपी शिक्षकाविरूद्ध पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. या घटनेपासून गावात संतापाचे वातावरण आहे.
5 / 5
पन्नाचे अतिरिक्त एसपी बीकेएस परिहार यांनी सांगितले की, आरोपी शिक्षकाविरूद्ध अजयगड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मुलीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.
टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस