शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुप्तांगात रॉड खुपसून ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या

By पूनम अपराज | Published: January 07, 2021 9:14 PM

1 / 6
उत्तर प्रदेशच्या बदायूं जिल्ह्यातील उघाईटी भागात रविवारी रात्री एका महिलेवर सामूहिक बलात्कारानंतर एका महिलेच्या हत्या करण्यात आली.  (All photos - Aaj Tak)
2 / 6
पूजा करण्यासाठी गेलेल्या ५० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला त्यानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली.
3 / 6
शवविच्छेदन अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार महिलेच्या गुप्तांगात रॉड खुपसण्यात आला होता. याशिवाय डावी बरगडी, पाय आणि फुफ्फुसांना देखील गंभीर दुखापत झाली होती. डावा पाय आणि बरगडी आतून तुटली होती. महिलेचा अति रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. महिलेचा मृतदेह पाहून डॉक्टर देखील हैराण झाले. 
4 / 6
या प्रकरणी पोलिसांनी महंत सत्यनारायण दास याच्यासह त्याच्या एका शिष्य वेदराम आणि चालक यशराज यांच्यावर सामूहिक बलात्कारासह हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
5 / 6
मात्र अद्यापही आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. हाथरस घटनेनंतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेश हादरलं आहे.
6 / 6
ही धक्कादायक घटना अघैती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अघैती गावातील महिला रविवारी नेहमीप्रमाणे जवळच्या गावातील मंदिरात पूजेसाठी गेली. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने कारमधून या महिलेचा मृतदेह आणला आणि त्यानंतर तिला घराजवळ टाकून फरार झाला. याबाबत स्थानिकांनी माहिती देऊनही वेळेत पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत असा आरोप करण्यात आला आहे.
टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिस