TATA ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्ण संधी! विविध कंपन्यांमध्ये ४,५६४ रिक्त जागा; तुम्हीही करु शकता अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:29 IST
1 / 13आताच्या घडीला TATA ग्रुप देशातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये TATA ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तसेच नवीन क्षेत्रात उडी घेण्यासंदर्भात TATA ग्रुप योजना आखत आहे.2 / 13कोरोना संकटाचा मोठा फटका देशाला बसला. देशातील अनेक उद्योग बंद झाले. ऑटोमोबाइल क्षेत्र ते सेवा क्षेत्रातील लाखो रोजगार संपुष्टात आले. बेरोजगारीचे प्रमाण वाढले. मात्र, हळूहळू आता देश सावरत असून, उद्योगांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात होत आहे. 3 / 13या कोरोना संकटातही अनेक उद्योगांनी दमदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले. यामध्ये TATA ग्रुपमधील अनेक कंपन्या आघाडीवर होत्या, असे सांगितले जात आहे. सर्वांत विश्वासार्ह मानल्या गेलेल्या TATA ग्रुपमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 4 / 13TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्यांमध्ये सुमारे ४ हजार ५६४ जागा रिक्त असून, यासाठी अर्ज मागवले जात आहे. गेल्या ३० दिवसांपासून २१८८ तर गेल्या ७ दिवसांपासून ६१७ ओपन पदांची भरती प्रक्रिया घेण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. 5 / 13TATA ग्रुपमध्ये आताच्या घडीला सुमारे ७.५ लाख नोकरदार देश आणि विदेशात काम करतात. TATA ग्रुपमधील बी-७३७ एअरलाइनमध्ये पायलटपासून ते एन्ट्री लेवल कस्टमर सुपरवायझरपर्यंत विविध पदांसाठी अनुभवी, स्किल्स आणि शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. 6 / 13याशिवाय TATA ग्रुपमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), TATA मोटर्स, इंडियन हॉटेल्स, TATA कम्युनिकेशन, टायटन कंपनी, TATA कॅपिटल, TATA एआयए लाइफ, जॅग्वार लँड रोव्हर, TATA स्काय, TATA क्लिक, TATA टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांमध्यो नोकरीसाठी अर्ज करू शकता. 7 / 13TATA ग्रुपमधील अनेकविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी https://www.tata.com/careers/jobs/joblisting या संकेतस्थळावर भेट देऊ शकता, असे सांगितले जात आहे. 8 / 13TATA ग्रुपमधील कंपन्यातील कर्मचाऱ्यांसाठी समान संधी उपलब्ध करते, असे सांगितले जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देशातील १७ कार्पोरेट घराण्यांबाबत एक सर्व्हे घेण्यात आला. यामध्ये रिलायन्स नाही तर टाटा ग्रुप सर्वात विश्वासार्ह ग्रुप असल्याचे लोकांनी सांगितले. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठी म्हणजे दुपटीहून अधिक होती.9 / 13टाटा स्टीलला गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट विश्वास मिळाला. गेल्या वर्षी ही विश्वासार्हता ३२टक्के होती. यंदा ती ६६ टक्क्यांवर गेली आहे. या सर्व्हेमध्ये १५३ वर्षे जुना बिर्ला आणि मुकेश अंबानींचा रिलायन्स समूहदेखील सहभागी करण्यात आला आहे. या दोन्ही समुहांना अनुक्रमे पाच आणि ४.७ गुण मिळाले असून ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.10 / 13महत्वाचे म्हणजे कोणत्याही कंपनीला ५ पेक्षा जास्त गुण मिळालेले नाहीत. मात्र, २०१३ पेक्षा वरची रँक या कंपन्यांना मिळाली आहे. या सर्व्हेमध्ये ५२७४ गुतवणूकदारांची मते घेण्यात आली आहेत. विजेती टाटा आणि अन्य ग्रुपमध्ये मोठे अंतर आहे.11 / 13या उद्योग समुहांच्या विश्वसनियतेवर हा सर्व्हे घेण्यात आला आहे. बिर्ला, गोदरेज, टीव्हीएस हे गेल्या वेळच्या तुलनेत दोन रँक वर आले आहेत. मुकेश अंबानींची कंपनी सहा रँक आणि बजाज समूह चौथ्या क्रमांकावर असून गेल्यावेळपेक्षा सहा रँक वर आहे.12 / 13दुसरीकडे, अशा संकटकाळातही TATA ग्रुपमधील एका कंपनीने घसघशीत बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. सलग तिसऱ्या वर्षी बोनस जाहीर करणारी कंपनी म्हणजे Tata Motors.13 / 13कोरोना संकटकाळातही Tata मोटर्स कंपनीने कामगारांना यंदा दिवाळीसाठी किमान ३८ हजार २०० रुपये ते कमाल ५० हजार २०० रुपये बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीपेक्षा तीन हजार रुपयांनी बोनस जास्त आहे. या निर्णयाचा फायदा सहा हजार कामगारांना होणार आहे.