सरकारी नोकरी: सुप्रीम कोर्टात नोकरीची सुवर्णसंधी; कसा कराल अर्ज जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 09:07 IST
1 / 7सुप्रीम कोर्टात नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कोर्टातून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नोटिफिकेशनुसार एकूण २५ जागांवर भरती केली जाणार आहे. ही भरती एक्स-कॅड कोर्ट असिस्टंट (ज्युनिअर ट्रान्सलेटर) पदासाठी केली जाणार आहे.2 / 7नोकरीचा अर्च करण्यासाठी इच्छुकांना सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत main.sci.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज दाखल करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे आहे. 3 / 7सुप्रीम कोर्टात एकूण २५ जागांवर भरती केली जाणार आहे. यात आसाम, बंगाली, तेलुगु, गुजराती, उर्दू, मराठी, कन्नड, मल्याळम, मणिपुरी, पंजाबी या भाषांसाठी प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत. याशिवाय इंग्रजी आणि नेपाली भाषा ट्रान्सलेटरपदासाठीही प्रत्येकी एका जागेवर वॅकेन्सी आहे. 4 / 7सुप्रीम कोर्टाच्या पदभरतीसाठी तुमच्याकडे इंग्रजीसह संबंधित भाषेत कोणत्याही मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीतून डीग्री असणं बंधनकारक आहे. यासोबतच तुमच्याकडे संबंधित भाषेच्या ट्रान्सलेटरच्या कामाचा दोन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. तसंच कॉम्प्युटर ऑपरेशनची जाण असणं महत्वाचं आहे. 5 / 7ज्युनिअर ट्रान्सलेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय १८ हून अधिक आणि ३२ वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागावर्गीय तसेच माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिक श्रेणीसाठी उमेदवारांना कमाल वयाच्या नियमात नियमानुसार सूट देण्यात येईल. 6 / 7अर्जाच्या शुल्काबाबत बोलायचं झालं तर जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी ५०० रुपये शुल्क भरावं लागेल. तर एससी, एसटी, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीय उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क भरावं लागेल. 7 / 7नोकरीचा अर्ज दाखल करण्यासाठी सर्वात आधी कोर्टाची वेबसाइट main.sci.gov.in वर लॉगइन करा. यात होमपेजवरील भरती ऑप्शनवर क्लिक करा. यात कोर्ट सहाय्यक पदासाठी अर्ज करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर निधारित प्रारुपात ऑनलाइन अर्ज दाखल करा.