Railway Jobs : ना परीक्षा, ना मुलाखतीचं टेन्शन; १० वी पास उमेदवारांना रेल्वेत मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 15:19 IST
1 / 7भारतीय रेल्वेत अनेक पदांवर मोठी नोकरभरती निघाली आहे. एकूण १३० पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. 2 / 7विशेष म्हणजे इयत्ता दहावीपर्यंतचं शिक्षण केलेल्यांनाही अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार १५ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. 3 / 7दहावीमध्ये फक्त उमेदवाराचे किमान ५० टक्के गुण असले पाहिजेत. यासोबतच उमेदवाराचा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं गरजेचं आहे. 4 / 7अॅप्रेंटिससाठी उमेदवाराचं वय १५ ते २४ दरम्यान असणं आवश्यक आहे. यामध्ये आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेच्या अटीत सूट देण्यात आली आहे. 5 / 7रेल्वेतील अॅप्रेंटिस नोकरीसाठी त्याच्या वैयक्तीक माहितेचे कागदपत्र असणं गरजेचं आहे. 6 / 7पासपोर्ट साइज फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी, इयत्ता १० वीचं उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र आणि आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र गरजेचं आहे. 7 / 7उमेदवारांची निवड ही त्यांच्या मेरीटवरुन केली जाणार आहे. अर्जाचे शुल्क १०० रुपये इतके असून यात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यासोबतच दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेलं नाही.