शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Tips: 'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:31 IST

1 / 9
Investment Tips: आपल्या मुलांच्या भविष्याचं नियोजन केल्यानं आपल्याला त्यांचा अभ्यास, एक्स्ट्रा करिकुलर अॅक्टिव्हिटीज किंवा परदेशात अभ्यास यासारख्या गोष्टींसाठी बचत करण्यास मदत होते. याचा अर्थ पुढे मोठ्या खर्चाचा ताण येणार नाही, म्हणून प्लॅनिंग करून तुम्ही खात्री करा की तुमचं मूल पैशाची चिंता न करता आपली स्वप्नं पूर्ण करू शकेल. आज उचललेलं हे एक छोटेसं पाऊल आहे ज्यामुळे भविष्यात मोठा फरक पडतो.
2 / 9
आपल्या मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी स्पष्ट आणि विचारपूर्वक नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे. गुंतवणुकीचा हेतू काय आहे, शिक्षण, करिअर किंवा घर खरेदीसारखा मोठा खर्च हे आधी ठरवा, मग ते ठरलेलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याकडे किती वेळ आहे, याचा विचार करा.
3 / 9
पीपीएफ - पीपीएफ हा एक सुरक्षित आणि दीर्घकालीन पर्याय आहे जो निश्चित परतावा आणि कर लाभ देतो. यामध्ये १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करवी लागते आणि चक्रवाढ व्याजाद्वारे मजबूत बचत निधी तयार करण्यास मदत मिळते.
4 / 9
सुकन्या समृद्धी - जर तुम्हाला मुलगी असेल, तर ही दीर्घकालीन बचतीसाठी एक उत्तम सरकारी योजना आहे. ती चांगले व्याजदर आणि कर लाभ देते आणि २१ वर्षांनंतर किंवा मुलीचं लग्न झाल्यावर मॅच्युअर होते.
5 / 9
चाईल्ड सेव्हिंग प्लॅन - विमा कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या या योजना शिक्षण किंवा लग्न यासारख्या उद्दिष्टांना पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत. ते जीवन विमा कव्हर आणि मॅच्युरिटी बेनिफिट्स देतात, ज्यामुळे तुम्हाला काहीही झालं तरी तुमच्या मुलांच्या गरजा पूर्ण होतात याची खात्री होते.
6 / 9
म्युच्युअल फंड - हा गुंतवणूक पर्याय फ्लेक्सिबल आहे आणि बाजारातील कामगिरीवर आधारित उच्च परतावा देतो. तुम्ही इक्विटी (दीर्घकालीन वाढीसाठी), डेट (कमी जोखीम) किंवा हायब्रिड फंड (दोन्हींचे मिश्रण) यापैकी एक निवडू शकता.
7 / 9
युनिट लिंक्ड इन्शूरन्स प्लॅन - युलिपमध्ये गुंतवणूक आणि जीवन विमा एकत्र केला जातो. तुमचे पैसे अंशतः बाजारात गुंतवले जातात आणि अंशतः विम्यासाठी वापरले जातात. यामध्ये कर सवलतही मिळते आणि तुम्हाला इक्विटी किंवा डेट फंड यापैकी एक निवडण्याचा पर्याय दिला जातो.
8 / 9
नॅशनल सेव्हिंग स्कीम - हा एक कमी जोखीम असलेला, सरकारचं पाठबळ असलेला पर्याय आहे जो ५ वर्षांत निश्चित परतावा देतो. जर तुम्हाला हमी परतावा आणि किमान जोखीम आवडत असेल तर हा एक सुरक्षित पर्याय आहे.
9 / 9
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकPPFपीपीएफMONEYपैसा