शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:46 IST

1 / 7
जर तुम्हाला असं वाटत असेल की गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक आहे, तर हा गैरसमज सोडून द्या. फक्त ₹१५०० च्या SIP नं सुरुवात करून तुम्ही कोट्यवधी कमावण्याचं तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. स्टेप-अप SIP चं सूत्र तुमच्या छोट्या गुंतवणुकीला मोठ्या फंडात बदलू शकतं. २५ वर्षांत ₹५९,०३,२५३ चा फंड कसा तयार होईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
2 / 7
एसआयपी म्हणजे सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दरमहा म्युच्युअल फंडमध्ये निश्चित रक्कम गुंतवणं. तर स्टेप-अप एसआयपीमध्ये, तुम्ही दरवर्षी तुमची एसआयपी रक्कम वाढवता. उदाहरणार्थ, येथे सुरुवातीची रक्कम ₹१५०० असेल आणि दरवर्षी १०% टॉप-अप करावं लागेल.
3 / 7
समजा तुम्ही २५ वर्षांसाठी SIP सुरू केली आहे. पहिल्या वर्षी, ₹१५०० ने सुरुवात करा, नंतर पुढच्या वर्षी ते १०% ने वाढवा म्हणजे ₹१५०. अशा प्रकारे SIP ₹१६५० होईल. पुढच्या वर्षी, ₹१६५० १०% नं वाढवा आणि SIP ₹१८१५ होईल. अशा प्रकारे, दरवर्षी सध्याच्या SIP रकमेवर रक्कम १०% ने वाढत राहील.
4 / 7
जर ही एसआयपी २५ वर्षे चालू राहिली आणि सरासरी १२% परतावा मिळाला, तर एकूण निधी ₹५९,०३,२५३ (अंदाजे ५९ लाख रुपये) होईल. २५ वर्षांत, तुम्ही फक्त ₹१७,७०,२४७ गुंतवाल आणि १२ टक्के दरानं व्याजाद्वारे ₹४१,३३,००६ मिळवाल.
5 / 7
जर तुम्ही फक्त ₹१५०० ची फिक्स्ड एसआयपी केली असता तर फंड कमी असता. पण दरवर्षी १०% नं कंपाउंडिंग वाढवल्यानं कंपाउंडिंगचा परिणाम खूप जास्त होतो. ही स्टेप-अप एसआयपीची खासियत आहे.
6 / 7
जे लोक नोकरी करतात आणि ज्यांचं उत्पन्न दरवर्षी वाढतं. जे विद्यार्थी थोड्या रकमेपासून सुरुवात करू इच्छितात. जे लोक घरखर्चानंतर उरलेले पैसे गुंतवू इच्छितात, त्यांच्यासाठी स्टेप अप एसआयपीचा पर्याय उत्तम ठरू शकतो.
7 / 7
म्युच्युअल फंडांमध्ये स्टेप-अप एसआयपी सर्वोत्तम मानली जाते. तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड, इंडेक्स फंड, हायब्रिड फंडमध्ये स्टेप-अप एसआयपीमध्ये गुंतवणूक करू शकता. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा