1 / 6सरकारने ईपीएफ किंवा पीएफमधून पैसे काढण्याची ऑनलाइन सुविधा दिली आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोक कोणत्याही मोठ्या गरजेशिवाय त्यांच्या पीएफ फंडातून पैसे काढतात. यामुळे त्यांना निवृत्तीवेळी मिळणाऱ्या एकरकमी पैशांचे मोठे नुकसान होते. आवश्यक असेल तरच पीएफमधून पैसे काढणे कधीही चांगले अन्यथा लाखोंचा फटका बसतो. कसा तो जाणून घेऊ...2 / 6अर्थतज्ज्ञ म्हणतात की, जोपर्यंत अत्यंत तातडीची गरज नाही तोपर्यंत पीएफमधून पैसे काढणे टाळावे. त्यावर सध्या ८.१ टक्के दराने व्याज मिळत आहे. पीएफमधून जितकी मोठी रक्कम काढली जाईल तितका मोठा परिणाम निवृत्तीवेळी मिळणाऱ्या पैशांवर होईल. शक्यतो पीएफच्या पैशांना हात लावणे टाळावेच...3 / 6तुमच्याकडे मुदत ठेव (एफडी) असल्यास तुम्ही त्यावर कर्ज घेऊ शकता. यावर सहज आणि कमी व्याजदरात कर्ज मिळते. अशा अनेक बँका आहेत ज्या एफडीवर ६ टक्क्यांपेक्षा कमी व्याजाने कर्ज देत आहेत.4 / 6क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या वित्तीय संस्था कार्डधारकांना त्यांच्या कार्ड प्रकार, खर्च आणि परतफेड यावर आधारित कर्ज देतात. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्यावर कर्ज घेऊ शकता.5 / 6नियमांनुसार, पगारदारांना त्यांच्या पगाराच्या १२% रक्कम पीएफ खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.6 / 6यात अनेक बँका वार्षिक ७ ते ८ टक्के दर आकारून २० ते ३० लाखांपर्यंतचे कर्ज देतात.