जगाचा रतन खत्री कोण? गँम्बलिंगच्या दुनियेचा सर्वात श्रीमंत व्यक्ती, नाव कधीच ऐकले नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:11 IST
1 / 7भारतीय उपखंडात एक मटका किंग होऊन गेला. त्याचे नाव सर्वांना परिचित होते. पाकिस्तानच्या कराचीचा जन्म, भारतात मटक्याचा बाजार मांडला तो रतन खत्री. असाच एक जगाच्या पाठीवर गँम्बलिंगच्या दुनियेचा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. ज्याने अचानक संपत्तीत मोठी वाढ नोंदवत जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या गँम्बलिंगच्या दुनियेच्या राजाचे नाव कधी ऐकले नसेल...2 / 7जगभरातील टॉपच्या २५ अब्जाधीशांपैकी १३ जणांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनी यंदा सर्वाधिक संपत्ती गमावली आहे. त्यांनी गेल्या सव्वादोन महिन्यात तब्बल १३२ अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आहे. 3 / 7परंतू, या पडझडीत एक व्यक्ती असा आहे ज्याने सर्वाधिक कमाई केली आहे. याचे नाव तुम्ही-आम्ही क्वचितच ऐकले असेल असा हा व्यक्ती आहे. या व्यक्तीचे नाव आहे जेफ यास. 4 / 7जेफ यास यांच्या संपत्तीत सर्वाधिक म्हणजे १७ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. यास हे ६२.८ अब्ज संपत्तीसह जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत २३ व्या क्रमांकावर आहेत.5 / 7जेफ यास यांची Susquehanna International Group नावाची प्रोप्रायटरी ट्रेडिंग फर्म आहे. त्यांनी कमी वयातच शेअर बाजार आणि गॅम्बलिंगमध्ये एन्ट्री केली. पोकर खेळणे, घोड्यांच्या रेसमध्ये पैसे लावणे हा त्यांचा छंद बनला, या छंदाने त्यांना कधी प्रोफेशनल गँम्बलर बनविले, त्यांनाच समजले नाही. 6 / 7गँम्बलर झाल्याने त्यांची मैत्रीही अशाच लोकांशी व्हायला लागली, ज्यांना गँम्बलिंग आवडायचे. याचवेळी त्यांनी शेअर बाजारातही पैसा लावला. पहिला शेअर त्यांनी कॅम्पबेल फूड कंपनीचा घेतला होता. तिथून ते फिलाडेल्फायाला गेले, मिलेनिअम मॅनेजमेंटचे संस्थापक इजरायल इंग्लैडर यांच्या मदतीने त्यांनी तेथील स्टॉक एक्सचेंजमध्ये एक जागा खरेदी केली. 7 / 7पाच मित्रांसोबत कंपनी स्थापन करून त्यांनी गँम्बलिंग आणि ऑप्शन मार्केट मेकर म्हणून सुरुवात केली. आता त्यांची कंपनी फायनान्शिअल असेट क्लासमध्ये ट्रेड करते, तसेच खेळ आणि राजकीय सट्टेबाजीमध्ये देखील काम करते.