By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 08:42 IST
1 / 9Galgotias University: दिल्लीत आयोजित 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'च्या (India AI Impact Summit) मंचवरून अचानक बाहेर काढलं जाणं हे कोणत्याही शैक्षणिक संस्थेसाठी मोठा धक्का असतो. यावेळी गलगोटिया युनिव्हर्सिटी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली, ज्यांनी या समिटमध्ये 'ओरियन' (Orion) नावाचा एक रोबोटिक डॉग सादर केला होता. 2 / 9हा युनिव्हर्सिटीचा स्वतःचा शोध असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र नंतर हा प्रत्यक्षात चीनच्या 'युनिट्री रोबोटिक्स' (Unitree Robotics) कंपनीचा 'Unitree Go2' हा मॉडेल असल्याचं उघड झालं. हा वाद वाढल्यानंतर युनिव्हर्सिटीला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.3 / 9हा युनिव्हर्सिटीचा स्वतःचा शोध असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र नंतर हा प्रत्यक्षात चीनच्या 'युनिट्री रोबोटिक्स' (Unitree Robotics) कंपनीचा 'Unitree Go2' हा मॉडेल असल्याचं उघड झालं. हा वाद वाढल्यानंतर युनिव्हर्सिटीला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं.4 / 9समिटमधील स्टॉलवर युनिव्हर्सिटीच्या वतीनं असे सांगण्यात आलं होतं की, कॅम्पसमध्ये एआय (AI) क्षेत्रावर ३५० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली असून 'ओरियन' नावाचा हा रोबोटिक डॉग त्यांच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'नं विकसित केलेलं उत्पादन आहे. 5 / 9मात्र, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी त्वरित ओळखलं की, हा तोच रोबोट आहे जो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आधीपासूनच उपलब्ध आहे आणि भारतातही २-३ लाख रुपयांना विकला जातो. वाद वाढल्यानंतर युनिव्हर्सिटीने स्पष्ट केलं की, हेतू आणि सादरीकरणाबाबत काहीतरी गैरसमज झाला आहे.6 / 9या संपूर्ण प्रकरणानंतर युनिव्हर्सिटीचे मालक सुनिल गलगोटिया चर्चेत आले आहेत. ग्रेटर नोएडा येथील या खाजगी युनिव्हर्सिटीची पायाभरणी त्यांनी केली होती. त्यांचा हा प्रवास अत्यंत साध्या सुरुवातीपासून झाला. १९३० च्या दशकात त्यांच्या कुटुंबाचे दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये एक छोटं पुस्तकांचं दुकान होतं. 7 / 9दिल्लीच्या 'श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स'मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९८० च्या दशकात प्रकाशनाचं काम सुरू केलं आणि 'गलगोटियास पब्लिकेशन्स'च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण अधिकार मिळवले.8 / 9सन २००० मध्ये त्यांनी 'गलगोटियास इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी'ची (GIMT) स्थापना केली, जिथे केवळ ४० विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली. त्यानंतर अभियांत्रिकी महाविद्यालय आणि २०११ मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळाला. 9 / 9आज ही युनिव्हर्सिटी हजारो विद्यार्थी आणि आधुनिक पायाभूत सुविधांसह देशातील नामांकित खाजगी संस्थांपैकी एक मानली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनिल गलगोटिया यांचा व्यवसाय आता हजारो कोटी रुपयांचा झाला आहे.