जगात सर्वाधिक कचरा कोणता देश करतो? १४३ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताचा वाटा किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 11:50 IST
1 / 7भारतात कचऱ्याचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वीच ब्रिटनमधून भारतात लाखोंच्या संख्येत टायर्सची निर्यात करण्यात आली आहे. कचरा ही सध्या जगाची समस्या बनत चालली आहे. 2 / 7एका नवीन संशोधन पत्रानुसार, २०२२ मध्ये जगात सुमारे २६.८ कोटी टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला होता, ज्यामध्ये भारताचा वाटा फक्त ३.५४ टक्के होता.3 / 7'नेचर' मासिकात प्रकाशित झालेल्या या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की या वर्षी सुमारे ४० कोटी टन प्लास्टिकचे उत्पादन झाले, ज्यामध्ये भारताचा वाटा ५ टक्के होता. प्लास्टिक उत्पादनात चीनचा वाटा सर्वात जास्त (४२ टक्के) होता, त्यानंतर अमेरिका (३२ टक्के) होती.4 / 7प्लास्टिकच्या वापरात चीन आघाडीवर आहे, जागतिक पुरवठ्यापैकी २० टक्के वापर एकटा चीन करतो. त्यानंतर अमेरिका (१८ टक्के), युरोपियन युनियन (१६ टक्के), भारत (सहा टक्के) आणि जपान (चार टक्के) यांचा क्रमांक लागतो.5 / 7या अहवालात दरडोई प्लास्टिक वापराचा डेटा देखील देण्यात आला आहे, त्यानुसार २०२२ मध्ये अमेरिकेत दरडोई प्लास्टिकचा वापर सर्वाधिक २१६ किलो होता. जपानमध्ये तो १२९ किलो आणि युरोपियन युनियनमध्ये ८७ किलो होता.6 / 7प्लास्टिक कचऱ्याच्या उत्पादनाबद्दल बोलायचे झाले तर, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २६.८ कोटी टन कचरा निर्माण झाला, ज्यापैकी चीन सर्वात मोठा उत्पादक (८.१५ कोटी टन) होता. त्यानंतर अमेरिका (४.०१ कोटी टन), युरोपियन युनियन (३.० कोटी टन) आणि भारत (९५ लाख टन) यांचा क्रमांक लागतो.7 / 7जागतिक स्तरावर प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते. अहवालानुसार, ४० टक्के कचरा डंपिंग केला जातो. तर ३४ टक्के जाळला जातो आणि फक्त ९ टक्के कचऱ्याचा पुनर्वापर होतो.