कोणती बँक देते सर्वात स्वस्त होम लोन? जाणून घ्या गृहकर्जांचे व्याजदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 13:03 IST
1 / 7आपलं स्वताचं घर असावं हे सर्वांचं स्वप्न असतं. आपण आपल्या आयुष्याची कमाई आपलं नवीन घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी खर्च करतो. घर घेण्यासाठी आता देशातील बँकाही कमी व्याजदार गृहकर्ज देत असतात. प्रत्येक बँकांचे व्याजदर वेगळे असतात.2 / 7आरबीआयने ऑगस्टमध्ये झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.अजूनही व्याजदरांमध्ये कोणताही बदल न होऊनही, देशातील अनेक बँकांनी निधीवर आधारित कर्ज दरांमध्ये किरकोळ खर्च सुधारित केला आहे.3 / 7स्टेट बँक ऑफ इंडिया गृहकर्जावर ९.१५% व्याजदर आकारत आहे. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी प्रत्येक महिन्याला ६७,७२५ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.4 / 7HDFC बँक ९.४% व्याज दराने गृहकर्ज देत आहे. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी प्रत्येक महिन्याला ६८,८५० रुपयांचा EMI भरावा लागेल.5 / 7एचडीएफसी व्यतिरिक्त, येस बँक देखील ९.४% व्याज दराने गृहकर्ज देत आहे.6 / 7Axis आणि ICICI बँक ९% व्याज दराने गृहकर्ज देत आहेत. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी ॲक्सिस बँक दरमहा ६५,७५० रुपये ईएमआय आकारेल, तर आयसीआयसीआय बँक ६६,९७५ रुपये दरमहा ईएमआय आकारेल.7 / 7सध्या युनियन बँक ऑफ इंडिया सर्वात स्वस्त गृहकर्ज ऑफर करत आहे. बँक ८.३५% व्याज दराने गृहकर्ज देत आहे. या व्याजदराने ७५ लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी घेता येते. यासाठी प्रत्येक महिन्याला ६३,९०० रुपयांचा EMI भरावा लागेल.