कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
By जयदीप दाभोळकर | Updated: August 23, 2025 09:58 IST
1 / 8Bank FD Vs. Post Office RD: जर तुम्हाला तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित ठिकाणी गुंतवून कायमचे जोखीममुक्त करून हमी परतावा मिळवायचा असेल, तर योग्य गुंतवणूक निवडणं महत्त्वाचं आहे. लोक अनेकदा गोंधळलेले असतात की ५ वर्षांसाठी कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी - बँकेची फिक्स्ड डिपॉझिट (FD) की पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट (RD). तर, कॅलक्युलेशन करून, आपल्याला समजेल की ५ वर्षांच्या कालावधीसाठी कोणती योजना अधिक फायदेशीर आहे?2 / 8दोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे स्वतःचे फायदे असले तरी ते गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घेतले पाहिजेत. पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD): चालू तिमाहीत, तुम्हाला यावर सुमारे ६.७% वार्षिक व्याज (त्रैमासिक चक्रवाढ) मिळू शकते.3 / 8बँक फिक्स्ड डिपॉझिट (FD): बँका त्यांच्या ५ वर्षांच्या FD वर साधारणपणे ६.५०% ते ७.००% व्याज देत असतात. FD वर किती परतावा द्यायचा हे बँकेनंच ठरवायचं असते. यावरून हे स्पष्ट होतं की तुम्हाला बँक FD पेक्षा पोस्ट ऑफिस FD वर चांगलं व्याज मिळू शकतं.4 / 8₹१ लाख गुंतवल्यावर ५ वर्षांनी तुम्हाला किती पैसे मिळतील? तर एका उदाहरणानं समजून घेऊया की जर तुम्ही ₹१ लाख गुंतवले तर ५ वर्षांनी तुमच्याकडे किती पैसे असतील.5 / 8यामध्ये तुमच्या गुंतवणूकीची रक्कम ₹१,००,००० असेल. यावर ७.५% वार्षिक (त्रैमासिक चक्रवाढ) व्याज दिलं जातं. तुमच्या गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षे असेल. या योजनेत, व्याज तिमाही चक्रवाढ पद्धतीनं मोजलं जातं. परंतु व्याजाची रक्कम दरवर्षी दिली जाते. ५ वर्षांनंतर, तुमची ₹१,००,००० ची रक्कम सुमारे ₹१,४५,३२० पर्यंत वाढू शकते, म्हणजेच तुम्हाला सुमारे ₹४५,३२० चा नफा मिळू शकतो.6 / 8आरडीमध्ये महिन्याला समजा ₹१,५०० ची गुंतवणूक करत असाल. यावर तुम्हाला ६.७% वार्षिक (त्रैमासिक चक्रवाढ) व्याज दिलं जाईल. यात तुमचा गुंतवणूक कालावधी ५ वर्षे असेल. ५ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक (₹१,५०० x ६० महिने) सुमारे ₹९०,००० असेल. यावर तुम्हाला एकूण व्याज सुमारे ₹१७,९९८ असू शकतं. अशा प्रकारे, ५ वर्षांनंतर तुम्हाला परिपक्वतेवर एकूण ₹१,०७,९९८ मिळू शकतात. आरडीमध्ये एकरकमी गुंतवणूक केली जात नाही, तर दरमहा एक निश्चित रक्कम जमा केली जाते. म्हणून, तुलना करण्यासाठी आरडीचं गणित वेगळं आहे.7 / 8ज्यांच्याकडे एकरकमी रक्कम आहे त्यांच्यासाठी एफडी चांगली ठरू शकते. मुळात, तुम्ही संपूर्ण रक्कम एकाच वेळी जमा करता. याचा लॉक-इन कालावधी ५ वर्षांचा आहे, परंतु ६ महिन्यांनंतर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा आहे (परंतु, यामध्ये व्याजदर कमी-अधिक असू शकतो).8 / 8RD नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा दरमहा कमाई करणाऱ्यांसाठी, ज्यांना लहान बचत करून मोठा निधी मिळवायचा आहे, त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. या दोन्ही योजना सरकारी संरक्षणाच्या कक्षेत येतात, जेणेकरून तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. (टीप: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)