शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आरबीआयकडे १.८० लाख कोटींच्या २००० च्या नोटा आल्या, RBI याचे काय करणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 9:32 AM

1 / 9
२००० च्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी सुरुवात होऊन २ आठवड्यांहून अधिक वेळ झाला आहे. आतापर्यंत सुमारे ५० टक्के २००० च्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. जेव्हापासून नोटाबंदीची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हापासून लोक बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात नोटा आणत आहेत आणि जमा करत आहेत किंवा त्या बदलून घेत आहेत.
2 / 9
अलीकडेच, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या संदर्भात माहिती दिली. १.८० लाख कोटी २००० च्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती दास यांनी दिली.
3 / 9
या परत आलेल्या नोटांचे बँक किंवा रिझर्व्ह बँक काय करणार? ती भंगार म्हणून विकेल की त्यांच्याकडून नवीन नोटा छापल्या जातील? निरुपयोगी झालेल्या नोटांचे RBI काय करते हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
4 / 9
RBI नोटांचे काय करणार?- मिळालेल्या माहितीनुसार, बँक आधी बंद पडलेल्या किंवा निरुपयोगी नोटा आरबीआयच्या क्षेत्रीय कार्यालयात पाठवते. मग इथून या नोटा गैरवापरापासून वाचवण्यासाठी काही वेळा जाळल्या जातात. काही नोटा खोट्या आहेत का हे तपासले जाते. यासाठी खास मशिनचा वापर केला जातो.
5 / 9
यानंतर मशीनद्वारे नोटांचे तुकडे केले जातात. जर नोटांचे आयुष्य चांगले असेल तर त्या रिसायकल केल्या जातात आणि त्यांच्यापासून नवीन नोटा बनवल्या जातात.
6 / 9
खराब नोटा फोडल्यानंतर या गोळा केल्या जातात. मग त्यांच्या विटा बनवल्या जातात. या नोटांचे तुकडे पुठ्ठे बनवण्यासाठी कारखान्यातही दिले जातात.
7 / 9
२०१६ मध्ये नोटाबंदी झाली तेव्हा बँकांनी जुन्या नोटांची विल्हेवाट लावण्यासाठी आरबीआय कार्यालयात नोटा जमा केल्या होत्या. त्यानंतर नोटांचा कचरा रद्दीच्या दराने कारखान्यांना विकला जात होता.
8 / 9
त्यावेळी सुमारे ८०० टन कचरा कारखान्यांकडे आला होता. जी कंपनीने २०० रुपये प्रति टन या दराने खरेदी केली होती. म्हणजे जेवढी नोट छापली जात नाही, तिचा कचरा कारखान्यांना त्यापेक्षा कमी दराने दिला जातो.
9 / 9
२००० ची नोट छापण्यासाठी सुमारे ४ रुपये खर्च येत होता. RBI ने २००० च्या नोटांचे चलन बंद केले आहे. आता त्यांच्या छपाईवर पैसा खर्च होत नाही. ५०० रुपयांची नोट छापण्याच्या बाबतीत, ५०० रुपयांची नोट १ रुपये मोजून छापली जाते. मात्र, नोटांचे चलन थांबल्यानंतर आणि बँकांमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची किंमत कमी होत जाते. मग फक्त त्यांच्या पुनर्वापर प्रक्रियेवर खर्च होतो.
टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकbankबँकNote Banनोटाबंदी