शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नियम पाळा, दंड टाळा! SBI, HDFC, ICICI बँकेत मिनिमम बॅलेन्स मर्यादा किती?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2022 3:41 PM

1 / 8
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), HDFC किंवा ICIC बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी अत्यंत बातमी महत्त्वाची आहे. खाते उघडल्यावर राष्ट्रीयीकृत बँकांच्या वतीने ग्राहकांना अनेक मोठ्या सुविधा दिल्या जातात. पण या सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही नियम पाळावे लागतात.
2 / 8
कोणत्याही बँकेत खाते उघडल्यानंतर, तुमच्या खात्यात मिनिमम एव्हरेज बॅलेन्स राखणे आवश्यक आहे. मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स अंतर्गत, बँकेने निश्चित केलेली शिल्लक खात्यात ठेवली पाहिजे. ही शिल्लक राखता न आल्यास बँकेकडून दंड आकारला जातो. प्रत्येक बँक मिनिमम अॅव्हरेज बॅलेन्स ठरवते, ग्राहकाला नेहमी त्या मर्यादेपर्यंत खात्यात पैसे ठेवणे आवश्यक असते.
3 / 8
बँकांची स्वतःची निश्चित सरासरी किमान शिल्लक असते. मात्र काही बँकांची मर्यादा समान आहे तर काहींची वेगळी आहे. एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांच्या मिनिमम बॅलन्सबद्दल जाणून घ्या...
4 / 8
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या बचत खात्यात मिनिमम एव्हरेज बॅलेन्स किती ठेवावे, हे तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे. SBI च्या खात्यातील शिल्लक मर्यादा शहरानुसार एक हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांपर्यंत आहे.
5 / 8
ग्रामीण भागासाठी, हे 1,000 रुपये आहे, जर तुमचे खाते निमशहरी भागातील शाखेत खाते असेल, तर तुम्हाला तुमच्या खात्यात 2,000 रुपये ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय मेट्रो सिटीमध्ये ही मर्यादा 3,000 रुपये आहे.
6 / 8
HDFC मधील मिनिमम एव्हरेज बॅलेन्स मर्यादा तुमच्या निवासस्थानावर अवलंबून असते. शहरांमध्ये ही मर्यादा 10,000 रुपये आहे. त्याच वेळी, निमशहरी भागात 5,000 रुपये आणि ग्रामीण भागात 2,500 रुपयांची मर्यादा आहे.
7 / 8
आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात, एचडीएफसी प्रमाणेच किमान शिल्लक ठेवली पाहिजे. येथे शहरी भागातील खातेदारासाठी 10,000 रुपये, निमशहरीसाठी 5,000 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 2,500 रुपये मर्यादा राखणे आवश्यक आहे.
8 / 8
काही विशेष बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याचा नियम लागू होत नाही. अशा बँक खात्यांमध्ये प्रधानमंत्री जन धन योजनेशी जोडलेली खाती, बेसिक सेविंग्स बँक डिपॉझिट अकाऊंट, पेन्शनधारकांची बचत खाती, सॅलरी अकाऊंट आणि अल्पवयीन मुलांची बचत खाती यांचा समावेश होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाhdfc bankएचडीएफसीICICI Bankआयसीआयसीआय बँकbankबँक