By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:39 IST
1 / 8Gold Silver Rate on MCX, 08 April 2026: आज म्हणजेच ८ एप्रिल २०२६ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी परतली आहे. मध्य पूर्वेतील युद्धात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत १६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. 2 / 8कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीचा थेट परिणाम कमोडिटी बाजारावर दिसून येत आहे. एमसीएक्सवर आज बाजार उघडताच सोन्याचा भाव १,५३,४७५ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव २,४२,३३९ रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचला आहे.3 / 8अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बाजारातील अनेक तज्ज्ञांनी यापूर्वीच असा अंदाज वर्तवला होता की, अमेरिका आणि इराणमधील युद्ध संपल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती सामान्य होतील आणि सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी येईल. 4 / 8मंगळवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,५०,४४८ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीची किंमत २,३०,७७९ रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली होती. कालच्या बंद भावाच्या तुलनेत आज सोन्याचे दर ३,०२७ रुपयांनी महागले आहेत, तर चांदीच्या दरात ११,५६० रुपयांची मोठी वाढ झाली आहे.5 / 8राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५३,९७० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तसंच २२ कॅरेट सोन्याचा दर १,४१,१५० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१५,५२० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला. दिल्लीत चांदीचा दर २,६०,००० रुपये प्रति किलोग्राम इतका नोंदवण्यात आला.6 / 8आर्थिक राजधानी मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५३,८२० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४१,००० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर १,१५,३७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत एक किलो चांदीसाठी २,६०,००० रुपये मोजावे लागत आहेत.7 / 8चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५३,१९० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४१,५९० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याची किंमत १,१५,५९० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. चेन्नईत आज एक किलो चांदीचा भाव २,६०,९०० रुपये इतका आहे.8 / 8कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,५३,८२० रुपये प्रति दहा ग्रॅम झालाय. २२ कॅरेट सोन्याची किंमत १,४१,००० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव १,१५,३७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावलाय. कोलकात्यात चांदीचा दर २,६०,००० रुपये प्रति किलोग्राम इतका आहे.