Vodafone-Idea च्या रिचार्ज प्लॅन्सवर मिळणार हेल्थ इन्शुरन्स, रुग्णालयात दाखल झाल्यास मिळणार बेनिफिट्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 11:29 IST
1 / 15सध्या दूरसंचार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही ना काही नवं आणण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान, एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया यांसारख्या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नव्या स्कीम्स आणल्या आहेत. 2 / 15परंतु आता व्होडाफोन आयडिया या कंपनीनं एक नवी स्कीम सुरू केली असून याअंतर्गत ग्राहकांना हेल्थ इन्श्युरन्सचे बेनिफिट्सही मिळणार आहेत. 3 / 15व्होडाफोन आयडिया या कंपनीनं आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्स या कंपनीसोबत हातमिळवणी केली असून Vi Hospicare ही सेवा लाँच केली आहे. 4 / 15यामध्ये कंपनीच्या प्रीपेड ग्राहकांना रुग्णालयात दाखल झाल्यास हेल्थ कवर मिळतं. 5 / 15व्होडाफोन आयडियाच्या प्रीपेड सेवेच्या ग्राहकांना २४ तासांच्या कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास १००० रूपयांपर्यंतचं कव्हर मिळणार आहे. 6 / 15याव्यतिरिक्त आयसीयूच्या खर्चासाठीही २ हजार रूपयांचं कव्हर मिळेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. 7 / 15या शिवाय कोरोना आणि पूर्वीपासून असलेल्या कोणत्याही आजारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यास त्यावरही हे बेनिफिट्स मिळणार आहेत. 8 / 15Vi Hospicare या सेवेचा फायदा ग्राहकांना ५१ रूपये आणि ३०१ रूपयांच्या रिचार्जवर मिळणार आहे. 9 / 15व्होडाफोन आयडियाच्या ५१ रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना ५०० एसएमएस बेनिफिट्स देण्यात येतात. तर याची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. 10 / 15याव्यतिरिक्त आता यामध्ये ग्राहकांना १ हजार रूपयांचं हेल्थ बेनिफिटही मिळेल. 11 / 15तर दुसरीकडे ३०१ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, १.५ जीबी डेटा, २ जीबी अतिरिक्त डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळते. याची व्हॅलिडिटी ३० दिवसांची आहे. या अंतर्गत ग्राहकांना आयसीयू ट्रिटमेंटसाठी २ हजार रूपये प्रति दिवसाचा फायदा मिळेल. 12 / 15या सेवेचा लाभ १८ ते ५५ वर्षांपर्यंतच्या लोकांना घेता येईल. तर ५१ रूपये किंवा ३०१ रूपयांच्या प्रत्येक रिचार्जवर याचा कालावधी २८ दिवसांनी वाढेल. 13 / 15परंतु यासाठी एक अट म्हणजे यासाठी सुरूवातीला ३० दिवसांचा वेटिंग पिरिअड लागू होणार आहे. 14 / 15देशात अनेकदा मेडिकल इमरजन्सी असते. ज्या ठिकाणी लोकं आपण केलेल्या बचतीतून पैसे देत असतात. या खर्चाचा मोठा बोजा त्यांच्यावर पडतो, असं मत या करारावर बोलताना आदित्य बिरला हेल्थ इन्थुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक बथवाल यांनी व्यक्त केलं. 15 / 15आरोग्याशी निगडित असलेल्या सर्व सुविधा युनिव्हर्सल असल्या पाहिजेत आणि त्यात आवश्यक उपचारांसाठई हॉस्पीटलायझेशन बेनिफिट्ससोबत कोणत्याही वेळी क्लेमची सुविधा मिळाली पाहिजे, अशसं आदित्य बिरला हेल्थ इन्शुरन्सचं म्हणणं असल्याचंही त्यांनी सांगितलं.