१४६ रूपये कमी देऊनही मिळतोय दुप्पट डेटा, ५६ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा कोणता आहे जबरदस्त प्रीपेड प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 14:50 IST
1 / 15सध्या भारतात दूरसंचार क्षेत्रात मोठी स्पर्धा सुरू आहे. दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्सही आणत आहेत. 2 / 15दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी व्होडाफोन-आयडियानं आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवे प्लॅन्स बाजारात आणले आहेत. 3 / 15गेल्या काही दिवसांमध्ये कंपनीनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवे प्लॅन्स किंवा आधीच्या प्लॅन्समध्ये काही अधिक बेनिफिट्स देण्यास सुरूवात केली आहे.4 / 15याव्यतिरिक्त कंपनी आपल्या अनेक प्लॅन्ससोबत ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शनही देत आहे. 5 / 15कंपनीच्या या अनेक प्लॅन्समध्ये आपण कोणता प्लॅन विकत घ्यावा हे अनेकदा ग्राहकांना समजतही नाही. 6 / 15परंतु आज असे काही प्लॅन्स पाहू ज्यात अधिक डेटाही मिळतो आणि अधिक व्हॅलिडिटीही मिळते. याची किंमत ५९५ रुपये आणि ४४९ रूपये इतकी आहे. पाहूया नक्की यात काय आहे फरक.7 / 15व्होडाफोन-आयडियाच्या ५९५ रूपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा देण्यात येतो. याप्रकारे ग्राहकांना एकूण ११२ जीबी डेटा वापरण्यास मिळतो. 8 / 15याव्यतिरिक्त अन्य सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस अशाही सुविधा या प्लॅनसोबत मिळतात. 9 / 15याशिवाय ग्राहकांना विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies and TV Classic अशा सुविधाही देण्यात येतात. यामध्ये विशेष म्हणजे ZEE5 चं एका वर्षाचं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 10 / 15याशिवाय कंपनीकडे ४४९ रूपयांचा ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचाही एक प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज ४ जीबी डेटा देण्यात येतो. 11 / 15यामध्ये ग्राहकांना एकूण २२४ जीबी डेटा मिळतो. या प्लॅनसोबतही ग्राहांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएसची सुविधाही मिळते. 12 / 15याशिवाय विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi Movies & TV Classic चंही अॅक्सेस देण्यात येतं. परंतु या प्लॅनसोबत ग्राहकांना ZEE5 ची मेंबरशीप मिळत नाही. 13 / 15दोन्ही प्लॅन्समध्ये एकसमानच व्हॅलिडिटी आहे. तसंच दोन्ही प्लॅन्समध्ये कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही सारखीच आहे. 14 / 15डेटाबद्दल सांगायचं झआलं तर ४४९ रूपयंच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५९५ रूपयांच्या तुलनेत दुप्पट डेटा मिळतो. 15 / 15याशिवाय १४६ रूपयांचा खर्चही कमी येतो. अशातच तुम्हाला ZEE5 चं सबस्क्रिप्शन जास्त कामी येणार नसेल तर तुम्हाला ४४९ रूपयांचा प्लॅन जास्त फायदेशीर ठरू शकतो.