शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आधार कार्डवरील फोटो विचित्र आहे का? मग बदला ना!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 6:54 PM

1 / 5
आधार कार्डवरील फोटो पाहिले तर अनेकदा आपल्या स्वत:चा फोटोदेखील आपल्याला ओळखता येत नाही. सुरुवातीला आधारकार्ड जेव्हा आले त्यावेळी अनेकांसाठी तो कौतुकाचा विषय होता. आधार केंद्रावर काढलेले फोटो अनेकांसाठी विनोदाचा विषय बनतात.
2 / 5
आधार कार्डवरील फोटोची चर्चा होऊ नये यासाठी तुम्हाला आधार कार्डवरील फोटो अपडेट करण्याची गरज आहे. अनेकांना फोटोची समस्या जाणवत असेल. आधार कार्डवरील फोटो बदलू शकता परंतु ऑनलाइन माध्यमाद्वारे फोटो बदलला जाऊ शकत नाही. आधारवरील फोटो केवळ प्रत्यक्ष नोंदणी केंद्राला भेट देऊनच बदलता येतो.
3 / 5
https://www.uidai.gov.in/ या यूआयडीएआयच्या वेबसाइटला भेट द्या. यामध्ये माझा आधार - डाऊनलोड्स - आधार अद्ययन / सुधारणा फॉर्म वर क्लिक करून फॉर्म डाउनलोड करा. फोटोमधील बदलासाठी विनंती करणारा औपचारिक अर्ज विभागीय यूआयडीएआय कार्यालयात जाऊन भरा
4 / 5
हा फोटो अपडेट करण्यासाठी तुम्हाला 25 रुपये चार्ज आकारण्यात येणार आहे तसेच या 25 रुपयांवर जीएसटी करही भरावा लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक पावती दिली जाईल. ज्यात यूआरएन नंबर मिळेल. या नंबरच्या आधारे तुम्ही आधार अपडेट स्थिती पडताळणी करु शकतात.
5 / 5
तुमचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर नवीन फोटोसह आधार कार्ड तुमच्या घरी पोहचवलं जाईल. यासाठी जवळपास 15 ते 20 दिवस कालावधी लागू शकतात.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड