बाळाचं नाव ठेवण्यासाठी महिला घेतले तब्बल २७ लाख! आतापर्यंत ५०० मुलांचे नामकरण! काय आहे वैशिष्ट्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 12:22 IST
1 / 9आपल्यासाठी बारशाचा कार्यक्रम नवीन नाही. मुलगा किंवा मुलीचे नाव ठेवणे हे नेहमीच कुटुंबातील मोठे आणि पारंपरिक काम मानले जाते, ज्यात धर्म, ज्योतिष आणि वडीलधाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते. पण अमेरिकेतील एका महिलेने याच कामाला व्यावसायिक स्वरूप देत लाखो रुपयांच्या कमाईचे साधन बनवले आहे.2 / 9सॅन फ्रान्सिस्को येथील टेलर हम्फ्री नावाच्या या महिलेने व्यावसायिक 'नामकरण सल्लागार' म्हणून काम सुरू केले आहे. ती अनोखी, वेगळी आणि लक्षात राहणारी नावे सुचवते. त्यामुळेच, आपल्या मुलाचे नाव इतरांपेक्षा वेगळे असावे, असे वाटणारे श्रीमंत पालक त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात येतात.3 / 9टेलर हम्फ्रीने २०१८ मध्ये जेव्हा हा व्यवसाय सुरू केला, तेव्हा त्या केवळ १०० डॉलर (सुमारे ८,००० रुपये) घेऊन नावे सुचवत होत्या. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, एका पार्टीत काही श्रीमंत व्यावसायिकांशी चर्चा झाल्यानंतर त्यांना त्यांचे काम आणि त्याचे मूल्य कळले.4 / 9पुढे जेव्हा एका सुप्रसिद्ध मॅगझीनमध्ये त्यांची कहाणी छापून आली, तेव्हा त्यांच्याकडे कामाचा अक्षरशः पूर आला. पाहता पाहता त्यांचे हे छोटेसे काम एका मोठ्या व्यवसायात बदलले.5 / 9सध्या टेलर हम्फ्री यांच्या नामकरण सेवांचे शुल्क २०० डॉलर (सुमारे १७ हजार रुपये) पासून सुरू होते आणि ते ३०,००० डॉलर (सुमारे २७ लाख रुपये) पर्यंत पोहोचले आहे. त्या पॅकेजच्या किमतीनुसार काम करतात.6 / 9मोठा पॅकेज घेणाऱ्या ग्राहकांसाठी त्या खूप सखोल संशोधन करतात. त्या कुटुंबाचा देश, परंपरा, पालकांच्या अपेक्षा आणि नावाने मुलाची भविष्यात कशी ओळख निर्माण होईल, या सगळ्याचा अभ्यास करतात. 7 / 9विशेष म्हणजे, नाव निवडताना जर आई-वडील यांच्यात मतभेद होत असतील, तर टेलर त्यांना समजावून एका नावावर राजी करण्याचे काम देखील करतात. (सोशल मीडिया साभार)8 / 9टेलर हम्फ्री यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक मुलांना नावे सुचवली आहेत. सोशल मीडियावर त्यांचे एक लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, 'एक नाव फक्त उच्चारण्यासाठी नसते, ते मुलाची ओळख बनते. त्यामुळे ते विचारपूर्वक आणि खास पद्धतीने निवडले पाहिजे.' 9 / 9भारतातील पारंपरिक 'नामकरण' पद्धतीपेक्षा वेगळा असलेला हा व्यवसाय, अमेरिकेत सेवा क्षेत्रात असलेले मोठे व्यावसायिक यश दर्शवतो. (सोशल मीडिया साभार)