शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेतकरी, महिला, १२ लाखांपर्यंत कर नाही; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट! अर्थसंकल्पात १० मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 13:35 IST

1 / 11
Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये शेतकरी, महिला, उद्योगांपासून ते सामान्य कर्मचाऱ्यांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. पाहूया अर्थसंकल्पातील काही महत्त्वाच्या घोषणा.
2 / 11
अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्र्यांनी सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये १२ लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर लागणार नसल्याची घोषणा करण्यात आली.
3 / 11
नवीन इन्कम टॅक्स विधेयक पुढील आठवड्यात आणण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्सबाबत पुढील आठवड्यात सांगण्यात येणार आहे.
4 / 11
कर्करोगावरील औषधं स्वस्त होणार आहेत. कर्करोगासह जीवनावश्यक ३६ औषधं स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
5 / 11
ज्येष्ठ नागरिकांसाठीची टीडीएसची मर्यादा ५० हजारांवरून वाढवून १ लाख रुपये करण्यात आलीये.
6 / 11
इन्कम टॅक्स फायलिंगची मर्यादा २ वर्षांवरून वाढवून ४ वर्ष करण्यात आली आहे. आता ४ वर्षांचा आयटी रिटर्न एकत्र फाईल करता येईल.
7 / 11
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. किसान क्रेडिट कार्डावरील कर्जाची मर्यादा ३ लाखांवरून वाढवून ५ लाख करण्यात आलीये.
8 / 11
बिहारमध्ये मखाना बोर्डाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचा छोटे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना फायदा होणार आहे.
9 / 11
छोट्या उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड आणण्यात येणार आहेत. पहिल्या वर्षी १० लाख कार्ड देण्यात येतील.
10 / 11
MSME लोनसाठी गॅरेंटी कव्हर ५ कोटींवरून वाढवून १० कोटी करण्यात आलीये. आता १.५ लाख कोटींपर्यंत कर्ज मिळणार.
11 / 11
स्टार्टअप्ससाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आलीये. आता त्यांना १० कोटींऐवजी २० कोटी रुपयांचं कर्ज मिळणार आहे. याशिवाय गॅरेंटी फीदेखील कमी होणार आहे.
टॅग्स :Budget 2025अर्थसंकल्प २०२५nirmala sitharamanनिर्मला सीतारामनIncome Tax Slabआयकर मर्यादा