शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? मग पहिलं 'हे' काम करा; सहलीत कुठलीही चिंता नाही सतावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 12:51 IST

1 / 7
जीवन विमा, आरोग्य विमा, आयुर्विमा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विमांनंतर आता प्रवासी विम्याचे महत्त्व आणि गरज वाढत आहे. सहलीच्या नियोजनासोबतच प्रवास विम्याचे नियोजनही खूप महत्त्वाचे झाले आहे. प्रवास विमा तुम्हाला अनेक प्रकारच्या जोखमींपासून संरक्षण देतो. सध्याचा काळ पाहता, प्रवास विमा केवळ काही निवडक लोकांसाठीच नाही तर सर्व लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक बनला आहे.
2 / 7
तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्सचे अनेक फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला सामानाचे नुकसान, वैद्यकीय खर्च, वेळापत्रकातील बदल, पर्सनल लायबिलिटी इत्यादींसारख्या अनेक गोष्टींपासून संरक्षण मिळते.
3 / 7
सामान कव्हरेज : चेक-इन केलेले सामान प्रवास विम्याच्या अंतर्गत संरक्षित आहे. प्रवासादरम्यान तुमचे कोणतेही सामान हरवले तर तुम्ही या प्रकरणात दावा करू शकता.
4 / 7
वैद्यकीय खर्च : जर तुम्ही प्रवासादरम्यान कोणत्याही अपघाताला बळी पडलात तर प्रवास विमा तुम्हाला खूप मदत करू शकतो. यामध्ये तुम्हाला अपघात, बाहेर काढणे, वैद्यकीय खर्च इत्यादीसाठी संरक्षण मिळते.
5 / 7
प्लॅनमध्ये बदल : प्रवासादरम्यान वेगवेगळ्या परिस्थितीमुळे अनेक वेळा इच्छा नसतानाही कार्यक्रम बदलावा लागतो. तुमच्या प्लॅनमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे, फ्लाइट कॅन्सल किंवा हॉटेल बुकिंग रद्द झाल्यामुळे काही बदल झाल्यास, विमा कंपनी त्याची भरपाई करते.
6 / 7
पर्सनल लायबिलिटी : प्रवासादरम्यान, विमाधारक व्यक्तीकडून थर्ड पार्टीचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले, तर अशा परिस्थितीत प्रवास विमा तुमची खूप मदत करू शकतो. अशा परिस्थितीत, विमा कंपनी तुमच्याकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करते.
7 / 7
प्रवास विम्याबाबत वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या अटी आणि नियम असतात. तुम्ही ज्या कंपनीकडून प्रवास विमा घ्याल, त्या योजनेची संपूर्ण माहिती मिळवा.
टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटनMONEYपैसा