₹55 वरून आपटून थेट ₹6 वर आला हा शेअर! एका बातमीनं केला चमत्कार, आता खेरेदीसाठी तुटून पडले लोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 17:01 IST
1 / 7शेअर बाजारात टोयम स्पोर्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये आज अर्थात शुक्रवारी जबरदस्त तेजी दिसून आली आहे. कंपनीच्या शे्रमध्ये 4% ची तेजी दिसून आली आहे. हा शेअर व्यवहारादरम्यान 6 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला होता. या शेअरमध्ये आलेल्या तेजी मागे एक विशेष कारणही आहे. 2 / 7बॉलीवूड स्टार आणि फिटनेस आयकॉन सुनील शेट्टीने वर्ल्ड टेनिस लीगमध्ये टीम टीएसएल हॉक्सला आपली स्टार पॉवर दिली आहे. तसेच BSE-लिस्टेड स्पोर्ट्स कंपनी टोयाम स्पोर्ट्स लिमिटेड (TSL) चे ब्रँड अॅम्बेसेडर आणि पॅसिफिक स्टारचे मालक म्हणून आपली उपस्थिती मजबूत केली आहे.3 / 7टोयम इंडस्ट्रीज लिमिटेडची स्थापना 1985 मध्ये झाली होती. ही कंपनी कमोडिटी व्यवसाय, वित्त व्यवसाय, रेस्टॉरंट व्यवसाय आणि इव्हेंट व्यवसायात काम करते. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. 4 / 7कंपनीचा 0.54 टक्के हिस्सा FII च्या मालकीचा आहे आणि उर्वरित 99.46 टक्के हिस्सा जनतेकडे आहे. या कंपनीवर सध्या फार कमी म्हणजे 0.79 कोटी रुपये एवढे कर्ज आहे.5 / 7असी आहे शेअरची स्थिती - या शेअरचा 52-आठवड्यांचा उच्चांक 19.45 रुपये आणि निचांक 4.65 रुपये एवढा आहे. तसेच कंपनीचे मार्केट कॅप 300 कोटी रुपयांहून अधिक आहे. हा स्टॉक आपल्या 52-आठवड्यांच्या निचांकावरून 24 टक्के वर आहे. तसेच उच्चांकाच्या तुलनेत 71 टक्के खाली आहे. 6 / 7या वर्षात YTD मध्ये कंपनीचा शेअर 63% तर वर्षभरात 65% पर्यंत घसरला आहे. चार वर्षात हा शेअर 90% पर्यंत घसरला आहे. या कालावधीत याची किंमत 55 रुपयांवरून घसरून सध्याच्या किंमतीवर आली आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)