जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:52 IST
1 / 10हाँगकाँग : अनेक वर्षांपासून हे शहर राहणीमानासाठी जगातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक मानले जाते. येथे घरांच्या किमती खूप जास्त आहेत.2 / 10सिंगापूर : सिंगापूर देखील उच्च राहणीमान खर्च आणि वस्तू व सेवांच्या किंमतीसाठी ओळखले जाते.3 / 10झुरिच : स्वित्झर्लंडमधील नदाकाठी वसलेले हे शहर आपल्या श्रीमंतीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे राहणे आणि फिरणे देखील प्रचंड महाग आहे.4 / 10जिनिव्हा : झुरिचप्रमाणेच जिनिव्हामध्येही राहण्याचा आणि इतर खर्च खूप जास्त आहे. जगभरातून पर्यटक इथं फिरायला येतात.5 / 10न्यूयॉर्क शहर : अमेरिकेतील हे सर्वात मोठे शहर जगातील महागड्या शहरांपैकी एक आहे. समुद्रकिनारी वसलेले हे शहर अमेरिकेचे मुख्य व्यापारी केंद्र मानले जाते.6 / 10लंडन : लंडन शहर पारंपरीक आणि आधुनिक जीवनशैलीसाठी ओळखले जाते. लंडनमध्ये घरांच्या किमती आणि वाहतूक खर्च खूप जास्त आहेत.7 / 10टोकियो : जपानची राजधानी टोकियो देखील महागड्या शहरांच्या यादीत नेहमी असते. इथं तुम्हाला मुंबईसारखी प्रचंड गर्दी पाहायला मिळेल.8 / 10कोपेनहेगन : डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन उच्च जीवनशैली खर्चासाठी ओळखली जाते.9 / 10तेल अवीव : हे शहर जगातील पहिली स्मार्ट सिटी मानली जाते. इस्रायलमधील हे शहर राहणीमानासाठी देखील महागडे मानले जाते. 10 / 10सॅन फ्रान्सिस्को : हे शहर अमेरिकेतील सायन्स सिटी म्हणून ओळखली जाते. इथे फिरायचा आणि राहण्याचा खर्च खूपच जास्त आहे. (महागाई आणि आर्थिक परिस्थितीनुसार या शहरांच्या क्रमवारीत बदल होऊ शकतो.)