1 / 7Post Office Senior Citizen Savings Scheme: निवृत्तीनंतरची सर्वात मोठी चिंता म्हणजे दरमहा निश्चित वेतन येणं बंद होतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला असं गुंतवणूक साधन मिळालं की जिथे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा निश्चित उत्पन्न मिळत राहिल तर? अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. या सरकारी योजनेत सुरक्षित गुंतवणूक करून, तुम्हाला दरमहा ₹ २०,५०० चं हमी व्याज देखील मिळू शकतं. कसं ते जाणून घेऊ?2 / 7या योजनेचं नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आहे. हे विशेषतः वृद्धांसाठी तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज मिळतेच, शिवाय तुमचे पैसे १००% सुरक्षित देखील असतात.3 / 7एससीएसएस ही भारत सरकारद्वारे समर्थित एक लघु बचत योजना आहे, जी विशेषतः ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी तयार केलेली आहे. ही एक डिपॉझिट स्कीम आहे, ज्यामध्ये तुम्ही ५ वर्षांसाठी एकरकमी रक्कम जमा करता आणि सरकार तुम्हाला दर तीन महिन्यांनी त्यावर हमी व्याज देते.4 / 7ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायांपैकी, एससीएसएस ही सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. त्याचा ८.२% व्याजदर हा देशातील मोठ्या बँकांच्या ५ वर्षांच्या मुदत ठेवी (FD) पेक्षा खूपच जास्त आहे. एकदा तुम्ही त्यात पैसे गुंतवले की, त्यावेळचा व्याजदर संपूर्ण ५ वर्षांसाठी लॉक होतो. भविष्यात व्याजदर कमी झाले तरी, तुम्हाला ५ वर्षे त्याच उच्च दरानं व्याज मिळत राहील.5 / 7या योजनेत १ हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. हे आपण एका सोप्या गणनेनं समजून घेऊया. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकानं या योजनेत कमाल मर्यादा म्हणजेच ₹३०,००,००० ची गुंतवणूक केली तर, त्याला वार्षिक ८.२% व्याजदरानं एकूण ₹२,४६,००० (₹२०,५०० प्रति महिना) मिळतील. या प्रकरणात, ५ वर्षांसाठी एकूण व्याज ₹२,४६,००० x ५ = ₹१२,३०,००० असेल. अशाप्रकारे, ५ वर्षांनंतर मॅच्युरिटीवर, तुम्हाला तुमची गुंतवणूक (₹३० लाख) आणि एकूण व्याज (₹१२.३० लाख) मिळून ₹४२,३०,००० परत मिळतील.6 / 7६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती यात गुंतवणूक करू शकते. त्याच वेळी, व्हीआरएस घेणाऱ्या नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि संरक्षण खात्यातून निवृत्त होणाऱ्यांना काही अटींसह वयोमर्यादेत सूट दिली जाते.7 / 7SCSS मध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळतो. या योजनेतून मिळणारं व्याज करपात्र आहे हे लक्षात ठेवा. जर आर्थिक वर्षात व्याजाची रक्कम ₹१,००,००० पेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जातो. यातील गुंतवणूक मुदतपूर्तीच्या १ वर्षाच्या आत वाढवता येते. विस्तारित खात्यांना मॅच्युरिटीच्या तारखेला लागू दरानं व्याज मिळतं.