शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील एकमेव १० स्टार हॉटेल! सर्व सुखसोईंनी सुसज्ज; एका रात्रीसाठी किती पैसे मोजावे लागतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:59 IST

1 / 7
फिरण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कधीतरी दुबईला जाण्याची इच्छा नक्कीच निर्माण झाली असेल. वाळवंटात उभं राहिलेलं हे शहर प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. विशेषतः येथे असलेला बुर्ज खलिफाची वास्तूशैली जगभरात प्रसिद्ध आहे.
2 / 7
दुबई म्हटलं की प्रत्येकाला फक्त बुर्ज खलिफा इमारत डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र, अनेकांना इथल्या अलिशान हॉटेलबद्दल माहिती नसते.
3 / 7
हे आहे जगातील एकमेव १० स्टार असलेले बुर्ज अल अरब हॉटेल. जगातील कोणतेही हॉटेल लक्झरी आणि भव्यतेच्या बाबतीत याची बरोबरी करू शकत नाही.
4 / 7
हे दशतारांकीत हॉटेल वास्तुकलेचा चमत्कार आहे. याचा आकार पारंपारिक अरब धो बोटीसारखा आहे.
5 / 7
बुर्ज अल अरब हॉटेल जुमेराह ग्रुपच्या मालकीचे असून ही सरकारी मालकीची लक्झरी हॉटेल चेन आहे. या वास्तूची उंची ३२१ मीटर आहे. १९९९ मध्ये याचे बांधकाम पूर्ण झाले. हे हॉटेल मानवनिर्मित बेटावर असून तब्बल १ अब्ज डॉलर्स खर्च करून उभारले आहे. आज त्याची किंमत अंदाजे ८६४४ कोटी रुपये आहे.
6 / 7
या हॉटेलमध्ये १९९ लक्झरी डुप्लेक्स सुइट्स आहेत. इथं जगातील सर्व सुखसोयी एकाच छताखाली उपलब्ध आहेत. अतिथींना खाजगी समुद्रकिनारे आणि तलावांमध्ये प्रवेश मिळतो. तसेच आराम करण्यासाठी किंवा सूर्यस्नान करण्यासाठी एक विशेष टेरेस आहे.
7 / 7
राजेशाही थाट अनुभवायचा असेल तर तुम्ही हेलिकॉप्टर किंवा रोल्स-रॉयसद्वारे या हॉटेलमध्ये प्रवेश करू शकता. येथे एक रात्र राहण्यासाठी तुम्हाला सुमारे तब्बल १० लाख रुपये खर्च करावे लागतील.
टॅग्स :Dubaiदुबईsaudi arabiaसौदी अरेबियाhotelहॉटेलTravel Tipsट्रॅव्हल टिप्स