याला म्हणतात शेअर! ₹17 च्या स्टॉकची कमाल, गुंतवणूकदारांना केलं करोडपती, 6 महिन्यात पैसा डबल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 18:33 IST
1 / 7शेअर बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. त्यांपैकी एक म्हणजे, वारी रेन्यूएबल टेक्नॉलॉजीज (Waaree Renewable Technologies). 2 / 7या कंपनीच्या शेअरला गुरुवारी पुन्हा एकदा 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते. महत्वाचे म्हणजे, काही वर्षांपूर्वी या शेअरची किंमत केवळ 17 रुपये एवढी होती.3 / 7195 पट फायदा - गेल्या 5 वर्षांत ज्या गुंतवणूकदारांनी हा स्टॉक होल्ड करून ठेवला असेल, त्यांना 195 पट फायदा झाला असेल. 1 लाख रुपयांची गुंतवणूक करून होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांचा फंड आता 1.95 कोटी रुपेय झाला आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागल्यानंतर, 3317.15 रुपयांवर पोहोचली होती.4 / 76 महिन्यांत पैसा डबल - गेल्या एका महिन्याच्या कालावधीत या शेअरमध्ये 80 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तसेच, 6 महिन्यांचा विचार करता, सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट झाला आहे. या कालावधीत मल्टीबॅगर स्टॉकच्या किंमतीत 125 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. 5 / 719,400% चा परतावा - गेल्या एक वर्षापूर्वी, Waaree Renewable Technologies चा शेअर 495.50 रुपयांवर होता. तो आता 3317 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 550 टक्क्यांची तेजी आली आहे. 6 / 7गेल्या 5 वर्षांपूर्वी कंपनीचा शेअर 17 रुपयांवर होता. अर्थात तेव्हापासून आतापर्यंत या शेअरच्या किंमतीत 19,400% ची वाढ झाली आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)