याला म्हणतात शेअर! ₹4 च्या स्टॉकवर तुटून पडले गुंतवणूकदार, सलग 6 महिन्यांपासून देतोय बंपर परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 01:26 IST
1 / 9शेअर बाजारात प्रचंड चढ-उताराचे वातावरण असतानाच बीएलएस इन्फोटेक, या आयटी क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी दिसून आली. डिसेंबर तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ झाली आहे.2 / 9आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी बीएलएस इन्फोटेकच्या शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून बडले होते. व्यवहाराच्या शेवटी, या शेअरला 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आणि तो 4.03 रुपयांवर बंद झाला. 12 फेब्रुवारीला हा शेअर 4.69 रुपयांवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.3 / 9BLS इंफोटेकने डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा नेट प्रॉफीट 0.01 कोटी रुपये एवढा आहे. डिसेंबर 2022 ला संपलेल्या गत तिमाही दरम्यान कुठल्याही प्रकारचा नेट प्रॉफिट/लॉस नोंदवण्यात आलेला नाही.4 / 9डिसेंबर तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रवर्तकांकडे 59.11 टक्के एवढी हिस्सेदारी आहे. याशिवाय सार्वजनिक शेअरहोल्डिंग 40.89 टक्के एवढी आहे. 5 / 9प्रवर्तकासंदर्भात बोलायचे झाल्यास, सुशील कुमार सरोगी यांच्याकडे 1,11,14,438 शेअर्स आहेत. ही 2.54 टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय प्रवर्तक ग्रुपकडे कंपनीचे 56.57 टक्के शेअर्स आहेत.6 / 9ही खासगी क्षेत्रातील कंपनी 1985 साली अस्तित्वात आली असून संगणक सॉफ्टवेअर सुविधा पुरवते. ही कंपनी कोलकात्यातील आहे. या कंपनीच्या शेअरने बीएसई इंडेक्सवर एका आठवड्याच्या कालावधीत मंद परतावा दिला असला तरी 2 आठवड्यात गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. 7 / 9या शेअरने एका महिन्याचा कालावधीतही जवळपास 30 टक्के परतावा दिला आहे. तसेच, तीन आणि सहा महिन्यांच्या कालावधीत अनुक्रमे 90 टक्के आणि 140 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.8 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)