याला म्हणतात छप्परफाड पैसा! असा कोणता म्युच्युअल फंड ज्याने एका वर्षात 82.73% रिटर्न दिला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 10:07 IST
1 / 8एका वर्षात जवळपास पैसे पावणे दोनपट, असा कोणता गुंतवणुकीचा मार्ग आहे जो तुम्हाला एवढा मालामाल करेल? तुम्ही म्हणाल नशीब लागेल, बाकी अशक्य... नाही एक असा म्युच्युअल फंड आहे ज्याने गेल्या एक वर्षात 82.73% रिटर्न दिला आहे. म्हणजे ज्यांनी या फंडात पैसे गुंतविले त्यांची तर लॉटरीच लागली आहे. 2 / 82023-24 या आर्थिक वर्षात आठ कोअर इंडस्ट्रीजचा एकत्रित इंडेक्स 157.8 वर पोहोचला होता. हाच इंडेक्स 22-23 मध्ये 146.7 होता. तो यंदाच्या एप्रिलमध्ये 160.5 वर गेला होता. जूनमध्ये जीएसटीचे कलेक्शन 1.74 लाख कोटी रुपयांवर गेले होते. याचाच अर्थ इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचा विकास मजबूत होत आहे. 3 / 8लोकांकडे पैसा आहे, पण तो कुठे गुंतवला तर चांगला परतावा मिळेल यात ते गोंधळलेले आहेत. काही म्युच्युअल फंड ४० टक्के, काही ३० टक्के आणि काही २०-२५ टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत. परंतू यापेक्षाही जास्तीचा परतावा देणारेही काही फंड आहेत. 4 / 8जाणकारांनुसार अशा बूम असलेल्या वातावरणात विविध सेक्टर्सच्या फंडमध्ये गुंतवणूक करणे चांगले ठरू शकते. यामध्ये पावर, इंन्फ्रा, बँकिंग, वित्तीय सेवा, कंझम्प्शन आदी क्षेत्र येतात. या क्षेत्रात जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. 5 / 8कोणी किती जरी सांगितले तरी ही एक रिस्कच आहे. कधी कोणती घडामोड घडेल आणि आता चांगले चालत असलेले शेअर्स धडाम होतील काही सांगता येत नाही. तरीही बाजाराचा अभ्यास करून, सारासार विचार करून गुंतवणूक करणेच योग्य. 6 / 8निप्पॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा फंडाने कमाल केली आहे. एका वर्षात या फंडाने तब्बल 82.73% रिटर्न दिला आहे. याच फंड हाऊसच्या फार्मा आणि कंझम्प्शन फंडाने 40.92% आणि 39.34% चा परतावा दिला आहे. 7 / 8निप्पॉन इंडिया इनोवेशन फंडाने १० महिन्यांत 47.92% रिटर्न दिला आहे. तर बँकिंग फंडाने या मानाने खूपच कमी म्हणजे 25.95% परतावा दिला आहे. याच प्रकारच्या आयसीआयसीआय, एक्सिस आणि आदित्य बिर्ला फंडांनी साधारण असाच परतावा दिला आहे. 8 / 8सेक्टरनुसार पहायचे झाले तर इन्फ्रास्ट्रक्टरने 46.05%, कंझम्प्शनने 47%, फार्माने 47.06% आणइ टेक्नॉल़जीने 30% परतावा दिला आहे. ही सरासरी 44.40% एवढी आहे. या सेक्टरचे संमिश्र असलेले फंड चांगला परतावा देण्याची शक्यता आहे.