शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:02 IST

1 / 9
शेअर बाजारात असे अनेक शेअर आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे नशीबच बदलले आहे. असाच एक शेअर म्हणजे, ‘श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क’चा (Shree Adhikari Brothers Television Network).
2 / 9
या कंपनीच्या शेअरने आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांच्या बाबतीतही काहीसे असेच केले आहे. या शेअरमध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त तेजी दिसून आली आहे.
3 / 9
गेल्या ५ वर्षांपूर्वी कंपनीचा शेअर २ रुपयांपेक्षाही कमी किंमतीवर होता. तो आता तब्बल १४०० रुपयांच्याही पुढे गेला आहे. अर्थात, एखाद्या गुंतवणूकदाराने तेव्हा, या शेअरमध्ये केवळ १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर आज तिचे मूल्य तब्बल ९.०४ कोटी रुपये झाले आहे. थोडक्यात काय? तर या स्टॉकने अवघ्या ५ वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.
4 / 9
आजही तेजी - हा शेअर गुरुवारी १.१९ टक्क्याच्या तेजीसह १४१० रुपयांच्या जवळपास ट्रेड करताना दिसत होता. यापूर्वी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) हा पेनी स्टॉक १३९२ रुपयांवर खुला झाला होता. यानंतर दिवसभरात त्याने १४२३ रुपयांचा इंट्रा-डे उच्चांक गाठला.
5 / 9
५ वर्षांत दिला ९३८०६.६७% परतावा - श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कच्या शेअरने गेल्या ५ वर्षांत तब्बल ९३८०६.६७ टक्क्यांचा परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्याचा विचार करता, या शेअरने एका महिन्यात ७६ टक्के, ६ महिन्यांत १३९ टक्के परतावा दिला आहे.
6 / 9
मात्र, २०२५ मध्ये या शेअरने ६ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे. पण असे असले तरी, १ वर्षांपर्यंत होल्ड केलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत २४ टक्क्यांचा फायदा झाला आहे.
7 / 9
कंपनीनं नाव बदलणार - गेल्या २४ नोव्हेंबरला या मल्टीबॅगर,स्टॉकची बोर्ड मीटिंग पार पडली. या बैठकीत बोर्डाने कंपनीचे नाव ‘श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क’ (Shree Adhikari Brothers Television Network) बदलून, Aqylon Nexus Limited असे करण्यास मंजुरी दिली आहे.
8 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketस्टॉक मार्केट