याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 21:30 IST
1 / 7खरेतर शेअर बाजाराकडे जोखमेचा खेळ म्हणूनही बघितले जाते. मात्र, “नो रिस्क, नो गेन” अशीही एक म्हण आहे. जर एखाद्याने योग्य वेळी, योग्य शेअरमध्ये पैसा लावला, तर हा बाजार रातो-रात आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही करतो. 2 / 7असे अनेक शेअर आहेत ज्यांनी या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अगदी आश्चर्चकारक परतावा दिला आहे. असाच एक शेअर म्हणजे, RRP Semiconductor Ltd चा.3 / 7RRP Semiconductor Ltd चा धमाका - सेमीकंडक्टर क्षेत्रातील या कंपनीने, आपल्या गुंतवणूकदारांना या वर्षात छप्परफाड परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअरने केवळ 10 महिन्यांतच तब्बल 5541% एवढा परतावा दिला आहे. 4 / 71 जानेवरीला RRP Semiconductor चा शेअर ₹185.50 वर होता. जो आता 10464 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात एखाद्या गुंतवणूकदाराने 10 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता तिचे मूल्य जवळपास 5 लाख रुपये एवढे झाले असते.5 / 7गेल्या 6 महिन्यांचा विचार करता या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1100% एवढा परतावा दिला आहे. तर एका महिन्याचा विचार करता 48% एवढा परतावा दिला आहे. 28 ऑक्टोबरला हा शेअर 10259.25 रुपयांवर बंद झाला.6 / 7असाच आणखी एक शेअर म्हणजे, Elitecon International Ltd चा. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर केवळ 10.37 रुपयांवर होता. तो आता 156 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या 1400% ने वधारला आहे. मात्र गेल्या एका महिन्यात हा शेअर 26% ने घसरला आहे. 7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)