शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 14:05 IST

1 / 5
महागाईच्या या युगात आपल्या हक्काच घर मिळणे कठीण झाले आहे. बहुतेक लोकांना घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. अशात प्रत्येकजण कमी व्याजदराने गृहकर्ज मिळवण्यासाठी धडपडत असतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच बँकाची यादी घेऊन आलो आहोत.
2 / 5
संशोधनानुसार, कॅनरा बँक सध्या सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत आहे. याशिवाय, अशा अनेक बँका आहेत ज्या ८% पेक्षा कमी व्याजदराने कर्ज देतात. या कर्जावरील प्रति लाख ईएमआय ८२४ ते ८३६ रुपये असेल.
3 / 5
स्वस्तात गृहकर्ज देणाऱ्या यादीमध्ये कॅनरा बँक ७.८०%, बँक ऑफ महाराष्ट्र ७.८५%, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ७.८५%, युनियन बँक ऑफ इंडिया ७.८५%, इंडियन बँक ७.९०%, आणि इंडियन ओव्हरसीज बँक ७.९०% असा समावेश आहे.
4 / 5
व्याजदर घसरण्याच्या या काळात कर्जदार रेपो लिंक्ड होम लोनकडे वळू शकतात. यामुळे ईएमआय कमी होईल.
5 / 5
ईएमआयमध्ये मूळ रकमेसह व्याज समाविष्ट असते. व्याजासह कर्ज फेडण्यासाठी कर्जदाराला दरमहा बँकेला विशिष्ट रक्कम भरावी लागते.
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँकBank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्रHomeसुंदर गृहनियोजन