By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 12:46 IST
1 / 6नवी दिल्ली : भारतात काही ठिकाणी दाट धुके निर्माण झाल्यामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या अन्य मार्गांनी वळविण्यात आल्या आहेत. गाडीला उशीर झाल्यास रेल्वेकडून प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. तिकीट रद्द केल्यास संपूर्ण पैसेही परत मिळतात.2 / 6१) गाडी उशिरा धावत असल्याची माहिती प्रवाशांना नोंदणीकृत मोबाइलवर मिळेल. २) आरक्षित तिकीट दाखविल्यास रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षागृहात मोफत थांबण्याची सुविधा मिळेल.3 / 6३) राजधानी, शताब्दी आणि दुरांतो या गाड्या ३ तासांपेक्षा अधिकउशिराने धावत असल्यास 'आयआरसीटीसी'कडून मोफत जेवण मिळेल. ४) रेल्वेस्थानकावरील खाण्या- पिण्याचे स्टॉल उशिरापर्यंत उघडे राहतील. ५) रेल्वेस्थानकावर सुरक्षेसाठी | अतिरिक्त कर्मचारी व आरपीएफचे जवान तैनात केले जातील.4 / 6■ तुम्ही काउंटरवरून रोखीने तिकीट घेतले असल्यास तुमचे पैसे काउंटरवर लगेच परत मिळतील. ■ काउंटरवरून डिजिटल पेमेंट करून तिकीट घेतले असल्यास रिफंड ऑनलाइन पद्धतीनेच मिळेल. 5 / 6■ तिकीट ऑनलाइन बुक केले असल्यास ऑनलाइन पद्धतीनेच रद्द करावे लागेल. ■ डिपॉझिट रिसिप्ट (टीडीआर) फॉर्म ऑनलाइन भरून रिफंड घेता येईल.6 / 6वैयक्तिक कारणांनी तिकीट रद्द केल्यास तिकिटाच्या रकमेतून नियमानुसार शुल्क कपात होईल. उरलेली रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते.