मुकेश अंबानींना दर महिन्याला इतके पैसे देणार टीम कुक; Apple Store चं भाडे ऐकून थक्क व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 18:21 IST
1 / 10भारतातील पहिले अधिकृत Apple स्टोअर आपल्या मुंबईत उघडले आहे. मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स Apple स्टोअरचं उद्धाटन करण्यात आले आहे. या उद्धाटन सोहळ्याला Apple चे सीईओ टीम कुक(Tim Cook) भारतात आले होते. त्यांच्या हस्ते या पहिल्या स्टोअरचे उद्धाटन झाले. 2 / 10मायानगरी मुंबईत उघडण्यात आलेले Apple चे हे पहिले स्टोअर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स जियो वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये आहे. एका रिपोर्टनुसार, टिम कुक या जागेचे भाडे म्हणून दर महिन्याला लाखो रुपये अंबानींना देणार आहेत. 3 / 10रिपोर्टनुसार, Apple चे भारतातील पहिले स्टोअर रिलायन्सच्या मॉलमध्ये उघडले आहे. त्यासाठी दिर्घ कालावधीसाठी करार करण्यात आलाय. Apple Store साठी जवळपास २० हजार ८०० स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेण्यात आली आहे. 4 / 10ही जागा Apple कडून भाडेतत्वावर अंबानी यांच्याकडून घेण्यात आली आहे. कंपनीने या जागेसाठी १३३ महिने म्हणजे ११ वर्ष दिर्घ काळासाठी भाडे करार केला आहे. रिपोर्टनुसार, जागेसाठी Apple कडून मुकेश अंबानी यांना दर महिन्याला ४२ लाख रुपये भाडे म्हणून दिले जाणार आहे. 5 / 10Apple BKC Store चे दर तीन वर्षांनी भाडे दर बदलण्यात येईल. करारानुसार, ३ वर्षाच्या अंतरानंतर भाडे १५ टक्क्यांनी वाढवले जाईल. अंबानी कुटुंबाच्या मालकीच्या रिलायन्स जियो वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उघडण्यात आलेल्या या स्टोअरमधून फक्त भाडे मिळणार नाही तर आणखीही फायदा होणार आहे. 6 / 10सुरुवातीच्या ३ वर्षासाठी २ टक्के आणि त्यानंतर ३ वर्षांनी २.५ टक्के महसूल योगदानही अंबानी यांना Apple कडून मिळणार आहे. मुंबईत उघडलेल्या या ॲपलचं स्टोअरमध्ये १०० कर्मचारी काम करणार आहेत. त्यात २० हून अधिक भाषा बोलणारे लोक असतील. 7 / 10ॲपलच्या वेबसाईटसारखे याठिकाणीही ट्रेड इन प्रोग्रामचा पर्याय असेल. ज्यात जुने मोबाईल एक्सेंज करून नवीन डिव्हाईसही खरेदी करू शकाल. त्याशिवाय ॲपल स्टोअरमध्ये ४.५० लाख टिंबर एलिमेंट्स यूज करण्यात आले आहेत. 8 / 10कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतातील ॲपलचं पहिले स्टोअर १०० टक्के रिन्यूएबल एनर्जीतून ऑपरेशनल असेल. ॲपलने भारतात पहिल्यांदा १९८४ मध्ये Macintosh लॉन्च केला होता. त्यानंतर २५ वर्षांनी पहिले ॲपल स्टोअर बीकेसी, मुंबई येथे उघडले आहे. 9 / 10स्टोअर सुरू होण्यापूर्वी टीम कुक भारतात पोहोचले. येथे विविध सेलिब्रिटींची भेट घेतली. पहिल्यांदा त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुंकेश अंबानी यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी मुंबईतील वडा पाव ट्राय केला. हा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षितही उपस्थित होत्या.10 / 10Apple Store इतर सर्व स्मार्टफोन स्टोअर्सपेक्षा खूप वेगळे आहे. भारतीय संस्कृती लक्षात घेऊन हे स्टोअर तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये विविध राज्यांतील कलाकृती पाहता येतील. स्टोअरच्या छतावर १००० टाइल्स लावण्यात आल्या असून, यातील प्रत्येक टाइल ४०८ लाकडापासून बनवलेली आहे.