Success Story: २४ व्या वर्षी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय, घराघरापर्यंत पोहोचल्या; अशा बनल्या ३००० कोटींच्या मालकीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 09:01 IST
1 / 7व्यवसाय म्हटलं की अनेक चढउतार हे आलेच. एखादा व्यवसाय सुरू करुन तो हजारो कोटींचा बनवायचा हे काही सोपं काम नाही. आजवर तुम्ही अनेक व्यवसायिकांच्या यशोगाथा ऐकल्या असतील किंवा पाहिल्या असतील. आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि आज त्या व्यवसायाचं मूल्य हजारो कोटींच्या पुढे गेलं आहे.2 / 7देविता सराफ हे उद्योग जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे तीन हजार कोटींची संपत्ती आहे. या संपत्तीसह त्या देशातील सर्वात श्रीमंत सेल्फमेड महिला उद्योजक बनल्या आहेत. वू टेलिव्हिजन कंपनीची स्थापना करून त्यांनी हे यश मिळवलंय. देविता सराफ यांच्या आजवरच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.3 / 7देविता सराफ या मुंबईच्या रहिवासी आहेत. त्यांचं कुटुंबाचं व्यवसाय क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचे वडील राजकुमार सराफ हे झेनिथ कॉम्प्युटर्सचे चेअरमन होते. झेनिथ कॉम्प्युटर्स ही एक मोठी कम्प्युटर उत्पादक कंपनी आहे. अशा वातावरणात वाढलेल्या देविता यांना लहानपणापासूनच व्यवसायातील बारकावे समजून घेण्याची संधी मिळाली.4 / 7देविता सराफ यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांच्या झेनिथ कॉम्प्युटर्स या कंपनीत त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्या मार्केटिंग डायरेक्टर बनल्या. यानंतर त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ऑनलाइन प्रोग्राम मॅनेजमेंट कोर्सही केला.5 / 7२००६ मध्ये देविता यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी वू टेलिव्हिजनची स्थापना केली. त्यावेळी भारतात महागड्या टेलिव्हिजनची बाजारपेठ नवी होती. देविता यांनी हार मानली नाही. उत्तम टेक्नॉलॉजी आणि चांगल्या सेवांवर त्यांनी भर दिला. 6 / 7हळूहळू वू टेलिव्हिजन लोकांची पसंती बनली. कंपनीनं २०१२ मध्ये ८४ इंचाचा टीव्ही लाँच केला तेव्हा त्याला प्रचंड यश मिळाले होतं. यामध्ये टीव्ही आणि कॉम्प्युटर या दोन्हीसाठी काम करणारे नवे फीचर्स होते. त्यानंतर व्ह्यू टेलिव्हिजन एक प्रीमियम ब्रँड बनला.7 / 7हळूहळू वू टेलिव्हिजन लोकांची पसंती बनली. कंपनीनं २०१२ मध्ये ८४ इंचाचा टीव्ही लाँच केला तेव्हा त्याला प्रचंड यश मिळाले होतं. यामध्ये टीव्ही आणि कॉम्प्युटर या दोन्हीसाठी काम करणारे नवे फीचर्स होते. त्यानंतर व्ह्यू टेलिव्हिजन एक प्रीमियम ब्रँड बनला.