आजोबांकडून भुजिया बनवायला शिकले, शाळा सोडून बिझनेसमध्ये उडी; ४० वर्षांत उभी केली ₹२१ हजार कोटींची कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 09:07 IST
1 / 7बिकाजी फूड्स इंटरनॅशनलने उज्जैनच्या अरिबा फूड्समध्ये ५५ टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या अधिग्रहणामुळे बिकाजी फूड्सला आपल्या फ्रोजन फूडची अन्न उत्पादन क्षमता वाढविण्यास आणि बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढविण्यास मदत होईल. सध्या बिकाजीचं बाजार भांडवल २१,३८०.१३ कोटी रुपये आहे.2 / 7बिकाजी ब्रँडची सुरुवात शिवरतन अग्रवाल यांनी १९८० मध्ये केली होती. सुरवातीला ते आपल्या कुटुंबाचं वडिलोपार्जित काम म्हणजेच फक्त भुजिया बनवण्याचं काम करत होते. शिवरतन यांचे आजोबा गंगाभिषण हलदीराम अग्रवाल यांनी १९४० मध्ये राजस्थानमधील बिकानेर येथे भुजिया व्यवसाय सुरू केला. शिवरतन यांच्या आजोबांनंतर त्यांचे वडील मूलचंद अग्रवाल यांनी हा व्यवसाय हाती घेतला. हल्दीराम भुजियावाला या ब्रँड नावानं ते आपली उत्पादनं विकत असत.3 / 7मूलचंद अग्रवाल यांना शिवकिशन अग्रवाल, मनोहर लाल अग्रवाल, मधु अग्रवाल आणि शिवरतन अग्रवाल ही चार मुलं होती. शिवकिसन, मनोहरलाल आणि मधू यांनी मिळून भुजियाचा नवा ब्रँड सुरू केला आणि त्याला आपल्या आजोबांच्या नावावरून नाव 'हल्दीराम' असं नाव दिलं. पण या तिन्ही भावांसोबत व्यवसाय करण्याऐवजी शिवरतन अग्रवाल यांनी १९८० मध्ये एक नवा ब्रँड सुरू केला ज्याचं नाव बिकाजी असं होतं.4 / 7शिवरतन अग्रवाल यांनी आपल्या आजोबांकडून भुजिया बनवण्याची कला शिकली. अभ्यासापेक्षा त्यांचं मन व्यवसायाकडे होतं. त्यामुळेच आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडली आणि कौटुंबिक व्यवसायात उडी घेतली. काही वर्षे त्यांनी वडिलांना मदत केली. भावांपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीनं आणि समजूतदारपणानं मोठी प्रगती केली.5 / 7शिवरतन अग्रवाल हे भारतात मशीनचा वापर करून भुजिया बनवणारे पहिले व्यक्ती होते. यापूर्वी भारतात भुजिया हातानं बनवले जात असे. त्यांनी बिकानेरमध्ये भुजिया बनवण्याचा कारखाना उभारला आणि मशीनच्या मदतीनं भुजिया बनवण्यास सुरुवात केली. बिकाजी भुजिया बनवताना कुठेही मानवी हातांचा वापर केला जात नाही.6 / 7४० वर्षांत त्यांनी बिकाजीला भारतातील तिसरा सर्वात मोठा पारंपरिक स्नॅक उत्पादक बनवलं. शिवरतन अग्रवाल यांची सध्या संपत्ती १.९ अब्ज डॉलर्स आहे. आजच्या काळात बिकाजी अडीचशेहून अधिक उत्पादनं बनवते. 7 / 7त्यांच्या उत्पादनांमध्ये पाश्चिमात्य स्नॅक्स आणि फ्रोजन फूड्सचाही समावेश आहे आणि बिकाजी उत्पादनं आज देशभरातील ८ लाखांहून अधिक दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. १९९२ मध्ये बिकाजींला इंडस्ट्रीयल एक्सिलंन्सी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.