Stock Market Zerodha Nithin Kamath : शेअर बाजारातून पैसा कमवायचाय? झिरोदाच्या नितीन कामथ यांचा हा सल्ला लक्षात ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 12:51 IST
1 / 5शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी जास्तीत जास्त अभ्यास करावा लागतो. जर तुम्ही अभ्यास न करता गुंतवणूक केली नाही तर तुम्हाला शेअर बाजारात नुकसान होण्याची शक्यता वाढते. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार आहेत जे मार्केट बुलिश असताना कंपनीच्या मूल्यांकनाकडे दुर्लक्ष करतात. 2 / 5यामुळेच कोविडनंतर गुंतवणूकदार अदानी ग्रुप, वेदांत, टाटा पॉवर आदी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. झिरोदाचे सीईओ आणि संस्थापक नितीन कामथ यांनी अशा गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.3 / 5कंपन्यांच्या हाय व्हॅल्युएशनवर झिरोदाचे नितीन कामथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हाय व्हॅल्युएशन अनेकदा मोठं करून दाखवलं जातं. अशा अपवादांना नियम बनवण्यापासून गुंतवणूकदारांनी वाचलं पाहिजे, असं ते म्हणाले.4 / 5आपण कोणत्याही कंपनीचं व्हॅल्युएशन पाहून खूश होतो. परंतु मी जितकं संस्थापकाशी संवाद साधतो, त्यावरून मला हाय व्हॅल्युएशन हानिकारक असल्याचं वाटतं, असंही नितीन कामथ म्हणाले.5 / 5ज्या कंपन्या अवास्तव मूल्यांकन दाखवून पैसे जमवतात त्या कंपन्यांकडे पाहून दु:ख होतं. हाय व्हॅल्युएशन अधिक खर्च करण्यास प्रवृत्त करतात. आपल्या मूल्यांकनाला न्याय देण्यासाठी प्रत्येक वेळी त्याच गतीने वाढ होणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.