Stock Market Update: एका महिन्यात नेमके कोणते शेअर्स कोसळले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 14:24 IST
1 / 5अमेरिकेडून व्यापार युद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदार धोक्याच्या मालमत्तेत गुंतवणूक टाळत असून ते सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत.2 / 5अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयासाठी २.५५ लाख कोटी रुपयांची सामान्य तरतूद करण्यात आल्याने रेल्वेचे शेअर्स तसेच इन्फ्राचे शेअर्सही कोसळले आहेत.3 / 5५.६९ टक्के घसरण बीएसई इन्फ्रा इंडेक्समध्ये झाली. बीएसई पीएसयू ४.३२ टक्क्यांनी घसरला आहे. पॉवर अँड एनर्जी इंडेक्स ७.१२ टक्क्यांनी घसरला.4 / 5 गेल्या वर्षभरात ५६३.१ टक्क्यांनी वाढलेला कोचिन शिपयार्डचा शेअर मागील महिनाभराच्या काळात ६.३९ टक्क्यांनी घसरला आहे. तर वर्षभरात १०९.१५ टक्क्यांनी वाढलेला माझगाव डॉकचा शेअर महिनाभरात ३.०३ टक्के वाढला आहे.5 / 5पायाभूत क्षेत्रातील एनबीसीसी कंपनीचे शेअर्स ६.८० टक्क्यांनी घसरले आहेत. एनसीसीच्या शेअरचीही ९.२७ टक्के घसरण झाली असून, पीएफसी १०.१४ टक्के आणि आरईसी लिमिटेडचे शेअर १७.१ टक्क्यांनी खाली आले आहेत.