शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:32 IST

1 / 10
शत्रूचे ड्रोन पाडण्यासाठी अँटी-ड्रोन सिस्टीम बनवणारी कंपनी झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये तुफान तेजी दिसून येत आहे. बुधवारी झेन टेक्नॉलॉजीजचा शेअर बीएसईवर ३ टक्क्यांहून अधिक वाढून २२२९.८० रुपयांवर बंद झाला.
2 / 10
गेल्या एका महिन्यात झेन टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये ६१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचा शेअर १३७८.५५ रुपयांवरून २२०० रुपयांच्यावर पोहोचला. गेल्या पाच वर्षांत, मल्टीबॅगर कंपनीचा शेअर ५१०० टक्क्यांहून अधिकने वधारला आहे.
3 / 10
स्मॉलकॅप कंपनी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडची अँटी-ड्रोन सिस्टीम ड्रोन शोधणे, पॅसिव्ह सर्व्हिलान्स, कॅमरा सेंसर्सवर ड्रोनचे क्लासीफिकेशन तथा ट्रॅकिंग करने आणि ड्रोन कम्युनिकेशन जाम करून धोका कमी करणे, आदी काम करते. झेन टेक्नॉलॉजीजचे अँटी-ड्रोन सिस्टिम मल्टी लेव्हल आणि मल्टी सेंसर असलेले आर्किटेक्चर आहे. अर्थात ही सिस्टिम ड्रोन अॅटॅक विरोधात व्यापक संरक्षण प्रदान करते.
4 / 10
सिस्टिमच्या मल्टी सेंसर सेटअपच्या मोड्यूल्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, यात RF बेस्ड ड्रोन डिटेक्टर, व्हिडिओ बेस्ड ड्रोन आइडेंटिफिकेशन अँड ट्रॅकिंग, रडार, ड्रोन आरएफ जामर आणि हार्ड किल देण्यात आले आहे. झेन टेक्नोलॉजीजचे अँटी-ड्रोन सिस्टिम हार्ड किल ऑप्शन्ससह येते. हार्ड किलमध्ये कायनॅटिक्स बेस्ड किल आणि नेट बेस्ड ड्रोन कॅचर हे दोन पर्याय आहेत.
5 / 10
पाच वर्षांत ५१५३% वधारला कंपनीचा शेअर - स्मॉलकॅप कंपनी झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा ​​शेअर पाच वर्षांत ५१५३ टक्क्यांनी वधारला आहे. ५ जून २०२० रोजी कंपनीचा शेअर ४२.४५ रुपयांवर होते. जो ४ जून २०२५ रोजी २२२९.८० रुपयांवर बंद झाला.
6 / 10
गेल्या ४ वर्षांत झेन टेक्नॉलॉजीजचा शेअर ३०३३ टक्क्यांची वाधारला आहे. तर गेल्या दोन वर्षांत कंपनीचा शेअर्स ४५९ टक्क्यांनी वाधारला आहे.
7 / 10
महत्वाचे म्हणजे, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २६२७.९५ रुपये एवढा आहे. याच वेळी, कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ८९३.८० रुपये एवढा आहे.
8 / 10
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 10

10 / 10

टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसाStock Marketशेअर बाजार