TATA शेअरचं तुफान, खरेदीसाठी लोकांची झुंबड; एक्सपर्ट म्हणतायत - ₹7100 पार जाणार किंमत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 16:48 IST
1 / 8शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण असताना देखील टाटा समूहाची रिटेल ब्रांच असलेल्या ट्रेंट लिमिडेटचा शेअर (Trent Limited Share) सातत्याने वधारताना दिसत आहे. कंपनीने 8 ऑगस्टला जून तिमाहीचे निकाल जारी केले. यानंतर शेअरमध्ये अधिक तेजी बगायला मिळत आहे.2 / 8हा स्टॉक सलग सहा सेशन्समध्ये नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. या कालावधीत 19% ची तेजी दिसून आली. गेल्या व्यवहाराच्या सत्रात हा शेअर ₹6,700 पार गेला आणि ₹6,750 या नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. या महिन्यात आतापर्यंत हा शेअर 14.57% ने वधारला आहे.3 / 8काय म्हणताय ब्रोकरेज - कंपनीच्या जून तिमाहीच्या निकालानंतर देशांतर्गत आणि जागतिक ब्रोकरेज कंपन्यांनी ट्रेंटबद्दल सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवला. यामुळे या शेअरची किंमत नव्या उच्चांकांवर पोहोचली आहे.4 / 8ॲक्सिस सिक्युरिटीजने स्टॉकची टार्गेट प्राइस ₹4,800 वरून ₹7,000 प्रति शेअर केली आहे. याचप्रमाणे मोतीलाल ओसवाल यांनी टाटा समूहाच्या समभागावरील टार्गेट प्राइस ₹6,080 वरून ₹7,040 प्रति शेअर केली आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचा अंदाजानुसार, हा शेअर ₹7,136 पर्यंत पोहोचेल. 5 / 8जून तिमाहीचे निकाल - ट्रेंटच्या फॅशन पोर्टफोलिओने पुन्हा एकदा जबरदस्त प्रदर्शन केले असून, डबल डिजिटमध्ये सेम-स्टोअर सेल्स ग्रोथ (एसएसएसजी) मिळवली आणि आणि आपल्या किरकोळ क्षेत्रात 35%चा विस्तार केला. 6 / 8या प्रभावी कामगिरीमुळे स्टँडअलोन कमाईमध्ये 57% एवढी वार्षिक वाढ झाली आहे. तसेच प्रति चौरस फूट अंदाजे विक्रीत 19% ची वाढ झाली आहे.7 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)