5800 रुपयांच्याही वर जाऊ शकतो HAL चा शेअर; एका महिन्यात दिला 38% परतावा, करतोय मालामाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:12 IST
1 / 9शेअर बाजारातील एरोस्पेस अँड डिफेन्स इंडस्ट्रीची कंपनी हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा शेअर शुक्रवारी 3 टक्क्यांनी वधारून 4294 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 10 ट्रेडिंग सेशन्सपैकी 9 मध्ये या महारत्न कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. 2 / 9गेल्या एका महिन्यात हिन्दुस्तान एरोनॉटिक्सच्या शेअरमध्ये 38 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या वर्षात मार्च महिन्यात एचएएलचा (HAL) शेअर निफ्टी PSE इंडेक्समध्ये बेस्ट परफर्मिंग शेअर ठरला आहे. 3 / 9डिफेन्स अथवा संरक्षण क्षेत्रातील या कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येऊ शकते आणि हा शेअर 5800 रुपयांच्याही पार जाऊ शकतो, असे मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे.4 / 9हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ची माहिती देणाऱ्या 16 विश्लेषकांपैकी १५ जणांनी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तर एका विश्लेषकाने कंपनीच्या शेअर्सना सेल रेटिंग दिले आहे. 5 / 9ब्रोकरेज हाऊस ULJK फायनान्शियल सर्व्हिसेसने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्ससाठी ५८१४ रुपयांचे लक्ष्य दिले आहे. याच वेळी, ब्रोकरेज हाऊस निर्मल बंगने संरक्षण कंपनीच्या शेअर्ससाठी ५५०९ रुपयांचे लक्ष्य दिले आहे. फिलिप सिक्युरिटीजने कंपनीच्या शेअर्ससाठी ५५०० रुपयांचे लक्ष्य दिले आहे. 6 / 9याशिवाय, मॉर्गन स्टॅनलीने ५२९२ रुपयांचे लक्ष्य दिले आहे. तसेच, आयसीआयसीआय सिक्युरिटीजने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेअर्ससाठी ५००० रुपयांचे लक्ष्य दिले आहे. ही माहिती सीएनबीसी-टीव्ही१८ च्या एका वृत्तात देण्यात आली आहे. 7 / 9पाच वर्षांत 1500% हून अधिक वधारला शेअर - हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (HAL) शेअर गेल्या पाच वर्षांत 1500 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. 27 मार्च 2020 रोजी हा शेअर 262.58 रुपयांवर होता. तो 28 मार्च 2025 रोजी 4294 रुपयांवर पोहोचला होता. 8 / 9गेल्या चार वर्षांत महारत्न कंपनीच्या शेअरमध्ये 750 टक्क्यांहून अधिक तेजी दिसून आली आहे. गेल्या तीन वर्षात एचएएलचा शेअर 450 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5675 रुपये एवढा आहे. तर नीचांक 3045.95 रुपये एवढा आहे.9 / 9(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)