शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सीए म्हणून सुरूवात, Wipro मध्ये मिळालं सीएफओ पद; पाहा कोण आहेत अपर्णा अय्यर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 9:53 AM

1 / 8
देशातील चौथी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोच्या व्यवस्थापनात मोठा बदल दिसून येत आहे. जतिन दलाल (Jatin Dalal) यांनी कंपनीच्या चीफ फायनान्शिअल ऑफिसर पदाचा (CFO) राजीनामा दिल्याची माहिती गुरुवारी कंपननं दिली. त्यानंतर कंपनीनं अपर्णा अय्यर (Aparna Iyer) यांची सीएफओपदी नियुक्ती केली आहे.
2 / 8
विप्रोमधील या बदलाचा परिणाम शुक्रवारी त्यांच्या शेअर्सवर दिसून आला. विप्रोचे शेअर्स सुमारे २ टक्क्यांनी घसरले. सध्या विप्रोचं मार्केट कॅप २६.४७ बिलियन डॉलर्सचं आहे. राजीनामा दिल्यानंतरही जतिन दलाल हे ३० नोव्हेंबरपर्यंत विप्रोमध्ये सीएफओ म्हणून कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, आता अपर्णा अय्यर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आलीये. चला जाणून घेऊया, कोण आहे अपर्णा अय्यर आणि काय आहे त्यांची प्रोफाइल?
3 / 8
अपर्णा अय्यर या जवळपास २० वर्षांपासून विप्रोशी जोडल्या गेल्या आहेत. २००३ मध्ये त्यांनी सीनिअर इंटर्नल ऑडिटर म्हणून पदभार स्वीकारला. जर क्वालिफिकेशनबद्दल सांगायचं झालं तर अपर्णा चार्टर्ड अकाउंटंट (CA) आहेत.
4 / 8
अपर्णा या २००२ च्या सीए बॅचच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियामध्ये (ICAI) सामील होण्यापूर्वी, अय्यर यांनी २००१ मध्ये मुंबईतील नरसी मोंजी महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी मिळवली.
5 / 8
अपर्णा अय्यर यांनी गेल्या २० वर्षांत विप्रोमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. ज्यामध्ये इंटर्नल ऑडिट, बिझनेस फायनान्स, फायनान्स प्लॅनिंग अँड अॅनालिसिस, कॉर्पोरेट ट्रेझरी आणि इनव्हेस्टर्स रिलेशन यांचा समावेश आहे. आतापर्यंत अपर्णा विप्रोच्या फुलस्ट्रा iDCloud ग्लोबल बिझनेस लाइनच्या वाईस प्रेसिडेंट आणि सीएफओ होत्या.
6 / 8
अपर्णा अय्यर यांच्याकडे फायनान्शिअल रिस्क मॅनेजमेंट, कॅपिटल अलोकेशन, फंड उभारणी, बिझनेस स्ट्रॅटजी आणि कंपनीच्या वाढीचा अनुभव आहे. त्यांच्या नव्या भूमिकेत, त्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी थियरी डेलापोर्ट यांना रिपोर्ट करतील आणि विप्रोच्या कार्यकारी मंडळात सामील होतील.
7 / 8
गेल्या काही महिन्यांत विप्रोमध्ये अनेक मोठ्या पदांवरील अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. २०२३ मध्ये आतापर्यंत विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव सिंग, अमेरिकाज-२ चे सीएफओ नितीन व्ही जगनमोहन यांनी कंपनीची साथ सोडली.
8 / 8
याशिवाय इंडिया हेड सत्य इसवरन, आयडीईएएसचे बिझनेस हेड राजन कोहली, उपाध्यक्ष गुरविंदर साहनी, अमेरिकाज १ सीएफओ कामिनी शाह, हेल्थकेअर आणि मेडिकल डिव्हाइसेसचे प्रमुख मोहम्मद हक आणि मॅन्युफॅक्चरिंग अँड हाय-टेक बिझनेस युनिटचे प्रमुख आशिष सक्सेना यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिली.
टॅग्स :Wiproविप्रोbusinessव्यवसाय