TATA ग्रुपचा धमाका! 1 वर 1 बोनस शेअर मिळताच गुंतवणूकदार मालामाल, 1 लाखाचे झाले 2.20 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 16:21 IST
1 / 10 खरे तर जे लोक शेअर बाजारातून पैसे कमावतात ते लोक दीर्घ काळासाठी स्टॉक होल्ड करून ठेवत असतात. तेव्हाच त्यांचा पैसा अनेक पटींनी वाढतो. शअर बाजारात दीर्घकाळासाठी गुंदवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना केवळ शेअरमध्ये आलेल्या तेजीतूनच नाही, तर लिस्टेड कंपनीकडून मिळणाऱ्या रिवॉर्डपासूनही नफा मिळत असतो.2 / 10एक लिस्टेड कंपनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना लाभांश म्हणून बोनस शेअर, शेअर बायबॅक, स्टॉक स्प्लिट आदींची घोषणा करत असते. यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत असतो.3 / 10टाटा ग्रुपच्या शेअरची किमाल - उदाहरणच द्यायचे झाल्यास, टाटा समूहाची कंपनी असलेल्या TCS ने बोनस शेअर्स जारी केल्यानंतर दीर्घकालीन गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळाला आहे. टाटा समूहाच्या या शेअरने गेल्या 18 वर्षांत तीन वेळा 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स जाहीर केले आहेत.4 / 10जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे शेअरहोल्डिंग या तीन वेळच्या बोनस शेअरनंतर, आठ पटींनी वाढली असती. अशा स्थितीत त्याच्या 1 लाख रुपयांचे 2.20 कोटी रुपेय झाले असतील.5 / 10TCS bonus share हिस्ट्री - टीसीएसने 2006 मध्ये एक्स-बोनस शेअर व्यापार केला, तेव्हा या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:1 बोनस शेअरची घोषणा केली होती, टाटा समूह असलेल्या आयटी कंपनीने जून 2009 मध्ये एक टीसीएस शेअर ठेवण्यासाठी आपल्या शेअर धारकांना पेमेंट करताना एक्स-बोनसचा व्यवहार केला होता. 6 / 10TCS च्या संचालक मंडळाने 2018 मध्ये पुन्हा एकदा कंपनीच्या एक शेअर बदल्यात एका बोनस शेअरची घोषणा केली होती आणि आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठे गिफ्ट दिले होते.7 / 10जर एखाद्या गुंतवणूकदाराने 18 वर्षांपूर्वी टीसीएसमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला टीसीएसचे जवळपास 833 शेअर मिळाले असते. कारण 18 वर्षांपूर्वी टीसीएसचा एक शेअर जवळपास 120 रुपयांना होता. 2006 मध्ये 1:1 बोनस शेअरच्या घोषणेनंतर, टीसीएसचे हे 833 शेअर 1,666 झाले असते. 8 / 10यानंतर जून 2009 मध्ये, आयटी कंपनीने 1:1 बोनस शेअरची घोषणा केली. यानंतर टीसीएसचे 1,666 शेअर 3,332 झाले असते. मे 2018 मध्ये 1:1 बोनस शेअर जारी केल्यानंतर टीसीएसचे हे 3,332 शेअर 6,664 शेअरवर पोहोचले असते. 9 / 10टीसीएसच्या शेअरची किंमत सोमवारी जवळपास 3270 रुपये प्रति शेअर होती. तर 18 वर्षांपूर्वी गुंतवणूक केलेल्या 1 लाख रुपयांचे आज एकूण 2.20 कोटी रुपये झाले असते. अर्थात, गेल्या 18 वर्षांत गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांचे 2.20 कोटी रुपेय झाले असते.10 / 10(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)