म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
या 10 पेनी स्टॉक्सने दिले बपंर रिटर्न्स; एका वर्षात 20,000% पर्यंत वाढ, किंमत ₹20 पेक्षा कमी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:32 IST
1 / 11Share Market Penny Stocks : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना लहान-मोठ्या सर्व शेअर्सवर लक्ष ठेवावे लागते. कमी किमतीत व्यापार करणाऱ्या छोट्या कंपन्यांच्या शेअर्सना पेनी स्टॉक म्हणतात. काही वेळा हे पेनी स्टॉक्सही कमी कालावधीत मल्टीबॅगर परतावा देतात. अस्थिरता असूनही अनेकजण या कमी किमतीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करुन दमदार कमाई करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पेनी स्टॉक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी अल्पावधीतच मोठा परतावा दिला आहे.2 / 11 श्री अधिकारी ब्रदर्स - श्री अधिकारी ब्रदर्स टीव्हीच्या शेअर्सनी एका वर्षात 20,000% पर्यंत दमदार परतावा दिला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 3.50 रुपयांवरून सध्या 722.55 रुपयांपर्यंत वाढली आहे.3 / 11 हेल्दी लाइफ अॅग्रीटेक लिमिटेड - या शेअरने एका वर्षात 1400% चा मजबूत परतावा दिला आहे. या काळात त्याची किंमत 500 रुपयांवरून 900 रुपयांपर्यंत वाढली.4 / 11 Vantage Knowledge Academy Limited- कंपनीचे शेअर्स एका वर्षात 13 रुपयांवरून 185.90 रुपयांपर्यंत वाढले. या कालावधीत व्हँटेज नॉलेज ॲकॅडमी लिमिटेडने 1300% पर्यंत मल्टीबॅगर परतावा दिला आहे.5 / 11 Marsons - या शेअरने एका वर्षात 1200% परतावा दिला आहे. या काळात त्याची किंमत 13 रुपयांवरून 179.25 रुपयांपर्यंत वाढली.6 / 11 Ace Angitech - या शेअरने एका वर्षात 1000% परतावा दिला आहे. या कालावधीत त्याची किंमत 19.76 रुपयांवरून सध्या 202.85 रुपयांपर्यंत वाढली आहे.7 / 11 BITS - BITS स्टॉकचे शेअर्स एका वर्षात 2 रुपयांवरून 18.27 रुपयांपर्यंत वाढले. या कालावधीत त्याने 774% चा मजबूत परतावा दिला आहे.8 / 11 तारापूर ट्रान्सफॉर्मर- तारापूर ट्रान्सफॉर्मरच्या शेअर्सनी एका वर्षात 650% पर्यंत परतावा दिला आहे. या काळात त्याची किंमत 6 रुपयांवरून 45 रुपयांपर्यंत वाढली आहे.9 / 11 एअरस्पेस इंडस्ट्रीज - एअरस्पेस इंडस्ट्रीजचे शेअर्स एका वर्षात 6 रुपयांवरून 42.94 रुपयांपर्यंत वाढले. या कालावधीत 580% चा मजबूत परतावा दिला आहे.10 / 11 रॉयल इंडिया कॉर्पोरेशन - रॉयल इंडिया कॉर्पोरेशनचे शेअर्स एका वर्षात 3.65 रुपयांवरून 24.01 रुपयांपर्यंत वाढले. या कालावधीत 560% पर्यंत परतावा दिला आहे.11 / 11 (टीप- आम्ही फक्त शेअर्सच्या कामागिरीविषयी माहिती देत आहोत. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञाची मदत घ्या.)