शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

90 पैशांच्या शेअर्सची धूम...! खरेदीसाठी तुटून पडले लोक; सलग दोन दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:23 IST

1 / 10
शेअर बाजारात आज नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी 'स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड'च्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअरला अप्पर सर्किट लागले.
2 / 10
शुक्रवारी कंपनीचा शेअर बीएसईवर ₹ ०.८८ या मागील बंद वरून ₹ ०.९२ वर पोहोचला, अर्थात शेअरच्या किंमतीत ५% वाढ झाली आहे. ही स्टॉकची अप्पर सर्किट लिमिटदेखील आहे.
3 / 10
शेअर्सची स्थिती - गेल्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सच्या शेअरची किंमत ₹३.५२ होती. यानंतर हा शेअर विक्रीच्या स्थितीत आला आणि गेल्या १३ जानेवारी रोजी ₹०.८१ पैशांवर आला. अर्थात, गेल्या एका वर्षात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सचे शेअर्स दबावाखाली आहेत.
4 / 10
कंपनीची मोठी घोषणा - स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सने १७ जानेवारी रोजी स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की, कंपनीच्या संचालक मंडळाने येथे झालेल्या बैठकीत १००००० रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या ४५०० एनसीडीजच्या वाटपाला मान्यता दिली आहे.'
5 / 10
एनसीडी हा असाच एक निश्चित उत्पन्न पर्याय आहे. ज्याच्य सहाय्याने, कंपन्या निधी उभारतात. हे एक सुरक्षित डेट इंस्ट्रूमेंट असते.
6 / 10
शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल बोलायचे झाल्यास, प्रमोटरकडे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्समध्ये १४.८६ टक्के हिस्सा आहे. प्रमोटर राम गोपाल जिंदाल यांच्याकडे १४८२६४८६० शेअर्स किंवा ८.५७ टक्के हिस्सा आहे.
7 / 10
याच बरोबर, गौरव जिंदाल यांचे ६३६१०९८० शेअर्स अथवा ३.६८ टक्के हिस्सेदारी आहे. याशिवाय, सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीत ८५.१४ टक्के हिस्सा आहे.
8 / 10
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
9 / 10

10 / 10

टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार