याला म्हणतात रिटर्न...! ₹61 च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिलाय 17757% परतावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:36 IST
1 / 8शेअर बाजार म्हणजे अनिश्चिततेचा बाजार असे म्हटले जाते. मात्र, शेअरबाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अप्लावदीतच मालामाल केले आहे. अगदी कोट्यधीश बनवले आहे. 2 / 8असाच एक शेअर म्हणजे, न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 13 वर्षांतच जवळपास 18000 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.3 / 8असा आहे शेअरचा परफॉर्मन्स - सध्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर जवळपास ₹ ११००० वर व्यवहार करत आहेत. १३ वर्षांपूर्वी हा शेअर ६१ रुपयांवर होती. 4 / 8अर्थात या शेअर ने गेल्या १३ वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास १७,७५७ टक्के एवढा बंपर परतावा दिला आहे. म्हणजेच, तेरा वर्षांपूर्वी एखाद्या व्यक्तीने या शेअरमध्ये ₹१ लाखांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे ₹१.८७ कोटी एवढे झाले असते.5 / 8सध्या अशी आहे शेअरची स्थिती - न्यूलँड लॅबोरेटरीजचा शेअर गुरुवारी (२७ फेब्रुवारी) एनएसईवर ६ टक्क्यांहूनही अधिक घसरून ₹ १०,९१५ वर व्यवहार करत होता. गेल्या एका वर्षात न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअरमध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली. 6 / 8गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअर्सची किंमत ११ टक्क्यांनी, तर गेल्या एका महिन्यात १९.१३ टक्क्यांहून अधिक घसरली आहे. वार्षिक आधारावर न्यूलँड लॅबोरेटरीजच्या शेअरची किंमत ₹१४,२९४ वरून ₹१०,९१५ प्रति शेअरवर आली आहे. ही २३.६४ टक्क्यांहून अधिकची घट आहे.7 / 8शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रमोटर्सकडे कंपनीची 32.68 टक्के एवढा वाटा आहे. तसेच, पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 67.32 टक्के एवढ वाटा आहे.8 / 8(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)